💥पुर्णा तालुक्यातील फुकटगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अभूतपूर्व शाळा पूर्व तय्यारी मेळावा संपन्न...!


💥सदर कार्यक्रमाचे उदघाटन पंचायत समिती सभापती अशोकराव बोकारे यांच्या हस्ते करण्यात आले💥


पुर्णा (दि.२२ एप्रिल) - तालुक्यातील फुकटगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आज शुक्रवार दि.२२ एप्रिल २०२२ रोजी शाळा पूर्व तय्यारी मेळावा उत्स्फूर्तपणे पार पडला.

सदर कार्यक्रमाचे उदघाटन पं.स.सभापती श्री अशोकराव बोकारे व शा.व्य. समिती अध्यक्ष श्री गंगाधरराव बोकारे यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री बालाजी बोकारे,श्री रघुनाथ बोकारे,श्री नामदेवराव बोकारे,श्री त्र्यंबकराव बोकारे,श्री जनार्धन बोकारे,श्री प्रल्हाद बोकारे,श्री नारायण महाराज बोकारे,श्री लक्ष्मण महाराज बोकारे,श्री संभाजी पौळ,श्री माणिकराव बोकारे,श्री रामचंद्र बोकारे,श्री संतोष बोकारे,श्री सखाराम बोकारे,श्री प्रशांत बोकारे,श्री ज्ञानेश्वर बोकारे,श्री भागवत बोकारे,श्री रामजी बोकारे इत्यादी माता-पालक उपस्थित होते.


सर्वप्रथम गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.सर्व गाव विद्यार्थ्यांच्या घोषणांनी दुमदुमून गेला.प्रभात फेरीत विद्यार्थ्यांचा उत्साह अगदी वाखाणण्याजोगा होता त्यानंतर मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते रिबीन कापून ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून शाळा पूर्व तयारी मेळाव्यास सुरुवात झाली मान्यवरांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत हार घालून,डोक्यावर टोप घालून व खाऊ देऊन करण्यात आले.त्यानंतर  नवागतांकडून प्रत्येक स्टॉलवर नेऊन सर्व कृती आनंदाने करून घेण्यात आल्या. त्यांच्यासाठी सुंदर असे सेल्फी स्टँड बनविण्यात आले होते.सर्व विद्यार्थ्यांनी सेल्फी काढून मजा केली.


या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी श्रीमती योगिता कुलकर्णी मॅडम,श्री विलास बोकारे सर,श्री भागवत शिंदे सर,श्री आबनराव पारवे सर,अंगणवाडी ताई श्रीमती अर्चनाबाई देसाई,अंगणवाडी मदतनीस, ईतर स्वयंसेविका,विद्यार्थी व विद्यार्थिनी व तसेच श्री दत्तराव बोकारे यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे बहारदार असे सूत्रसंचालन श्री भागवत शिंदे सर यांनी केले.तर आभार श्री आबनराव पारवे सर यांनी मानले एकंदरीत शाळा पूर्व तयारी मेळावा खुपच उत्साहात पार पडला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या