💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या हेडलाईन्स...!


💥गुणरत्न सदावर्तेंच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला 50 हजारांचे बक्षीस : बीड भाजप तालुकाध्यक्षाची घोषणा💥

✍️ मोहन चौकेकर

*एखादी व्यक्ती वर्ष, सहा महन्यात एखाद्यावेळी काही तरी बोलते. तेव्हा त्यांना फारसे गांभीर्याने घ्यायचे नसते - राज ठाकरेंच्या टीकेला शरद पवारांचे प्रत्युत्तर

*किरीट सोमय्यांना अखेर दिलासा : आयएनएस विक्रांतप्रकरणी उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर, चौकशीला हजर राहण्याचे निर्देश

*उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रालयात विविध विभागांना भेटी दिल्या व कामकाजाविषयी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली 

*दोन वर्षांनंतर यंदा पायी वारी निघणार, 21 जूनला पालखीचे* प्रस्थान, वारीचा सोहळाही जाहीर करण्यात आला 

*50 हजार रुपये बक्षीस:गुणरत्न सदावर्तेंच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला 50 हजारांचे बक्षीस, बीड भाजप तालुकाध्यक्षांनी केले जाहीर

*शॉर्ट सर्किटमुळे ऊसाच्या फडाला आग : इगतपुरीत 5 एकरावरील ऊस जळून खाक; शेतकऱ्याचं लाखांचं नुकसान, महावितरणचा गलथान कारभारामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला

*राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल : ठाण्यातील उत्तर सभेमध्ये तलवार दाखल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई, 7 ते 8 मनसे कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल

*सुप्रिया सुळेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर: म्हणाल्या - ज्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना दुखावलं, त्यांच्या टीकेबद्दल काय बोलणार, वेळ आल्यानंतर नक्कीच उत्तर देऊ

*निर्घृण हत्या: पुण्यात सराईत गुंडाचा दगडाने ठेचून खून, 8 ते 9 जणांनी केला हल्ला, नुकताच येरवडा कारागृहातून आला होता बाहेर

*मुस्लिम फळ विक्रेत्यांच्या दुकानांची कर्नाटकमध्ये तोडफोड,* धार्मिक स्थळांजवळून बाहेर काढण्याचे प्रयत्न 

*गुणरत्न सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, सदावर्तेंचा वकिल आज तिसऱ्यांदा बदलण्यात आला

*दोन वर्षानंतर मुख्यमंत्री मंत्रालयात ; कोरोना काळापासून मंत्रालयापासून होते दूर

*राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल, ठाण्याच्या सभेत तलवार दाखवल्याचं प्रकरण

*विद्यापीठ, महाविद्यालयांच्या ऑफलाईन परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना वेळ वाढवून द्या ; युवासेनेची मागणी

*नवनीत राणा यांच्या जीवाला धोका,केंद्रीय गृहामंत्रालयाने पुरवली 'वाय प्लस' सुरक्षा

*उद्धव ठाकरे यांना भेटलो,भविष्यात युती शक्य : प्रकाश आंबेडकर

*राज ठाकरे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व, ते कोणाची बी टीम म्हणून काम करणार नाहीत : चंद्रकांत पाटील

*उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर, नॉट रिचेबल असलेले किरीट सोमय्या संध्याकाळी मुंबईत दाखल होणार

*नवाब मलिकांना दणका:नवाब मलिक यांची उस्मानाबादेतील 148 एकर जमीन तात्पुरती जप्त, मुंबईतील संपत्ती ईडीकडून जप्त

*धनंजय मुंडेंची प्रकृती चांगली: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडेंची ब्रीच कँडी रुग्णालयात घेतली भेट; भोवळ आल्याने प्रकृती अस्थिर - अजित पवार 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या