💥औरंगाबाद येथील मातंग समाजातील मनेष शेषरात आव्हाड यांच्या मारेकऱ्यांना अटक करा...!


💥जिंतूर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी💥

जिंतूर प्रतिनिधी / बी.डी. रामपूरकर

औरंगाबाद येथील कै.मनेश आव्हाड यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करुन फाशीची शिक्षा देणे .लहुजी शक्ती सेना जिंतूर तालुक्याच्या वतीने औरंगाबाद येथील कै.मनेश आव्हाड यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पोलीस निरीक्षक यांच्यामार्फत सादर.

मातंग समाजातील मनेष शेषरात आव्हाड वय वर्ष २७ रा. मेधावाले सभागृह हडको एन.१२ औरंगाबाद या युवकाचा किरकोळ कारणावरून दि.२० एप्रिल २०२२ रोजी पाच ते सहा लोकांनी लाकडी दांडके व रॉडने गंभीर मारहाण करून जीवे मारण्यात आले आहे या घटनेच्या निषेधार्थ व मनेष शेषराव आव्हाड याच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून सदरील खटला फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवून दोषी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या आशयाचे निवेदन लहुजी शक्ती सेनेच्या वतीने देण्यात आले यावेळी जिंतूर तालूका अध्यक्ष  रमेश मुंजाजी मोहिते (गुज्जर), जिंतूर शहराध्यक्ष  छगन गणपत नेटके तालुका अध्यक्ष गजानन कांबळे, ज्ञानेश्वर ससे,युवराज कांबळे, सुनिल किशन सुतार तालूका विद्यार्थी आघाडी जिंतूर छगन गणपत नेटके शहराध्यक्ष जिंतूर दिपक आवचार,भागवत मोहिते,निवृत्ती मोहिते, राहूल मोहिते,सुमित मोहिते, अभिमन्यु मोहिते. कृष्णा मोहिते, गणेश कांबळे,आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या