💥पुर्णा तालुक्यातील रेती घाट लिलावधारकांनी केले जेसीबी मशीनव्दारे ठराविक रेतीसाठ्यापेक्षा जास्त अतिरेकी उत्खनन...!


💥जिल्हाधिकारी आंचल गोयल तात्काळ ईटीएसद्वारे पुर्णा तालुक्यातील रेती घाटांच्या मोजणीचे आदेश काढणार काय ?💥


पुर्णा (दि.२९ एप्रिल) - चोर चोर मौसेरे भाई अन् प्रत्येकाला रेतीची वरकमाई खाण्याची घाई ? अशी एकंदर अवस्था तालुक्यातील पुर्णा-गोदावरी नदीपात्रांवर रात्रंदिवस जेसीबी मशीनींचा वापर करून रेतीचे अतिरेकी उत्खनन करणाऱ्या रेती घाट लिलावधारक अन् त्यांच्या खाल्ल्या अण्णाला जागून नदीपात्रांवर दरोडे घालण्याची संमती देणाऱ्या प्रशासनातील भ्रष्टाचारी अधिकारी/कर्मचाऱ्यांची झाल्याचे दिसत असून तालुक्यातील पिंपळगाव बाळापूर,संदलापूर व कानखेड या रेती घाट लिलावधारकांनी ठराविक क्षेत्रासह नदीपात्रातील अन्य क्षेत्रातही घुसखोरी करीत रात्रंदिवस जेसीबी मशीनच्या साहाय्याने निर्धारीत साठ्याच्या व्यतिरिक्त हजारों ब्रास रेतीचे उत्खनन केल्याने जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी संबंधित रेती घाटांवर प्रत्यक्ष उपस्थित राहून रेती घाटांची ईटीएसद्वारे मोजनी करून संबंधित रेती घाट लिलावधारकांवर दंडात्मक कारवाईसह कायदेशीर कारवाई देखील करावी अशी मागणी होत आहे.

पुर्णा नदीपात्रावरील मौ.कानखेड रेती घाट लिलावधारक अनिल मुन्नालाल अग्रवाल पुर्णा,मौ.पिंपळगाव बाळापूर रेती घाट लिववलावधारक प्रसाद पांचाळ परभणी,संदलापूर रेती घाट लिलावधारक सुदाम लक्ष्मण माने परभणी या लिलाव धारकांनी आपआपल्या रेती घाटांवर अक्षरशः नग्नतांडव सुरू केल्याचे निदर्शनास येत असून संबंधित रेती घाटांवर महसुल प्रशासनाने ठरवून दिलेल्या एकशें दोन पैकी एकाही नियम अटींचे पालन केले जात नसून संबंधित रेती घाटांवर रात्रंदिवस एक नव्हे तर अनेक जेसीबी यंत्रांचा वापर करून रेती लिलावा दरम्यान निर्धारीत क्षेत्रा व्यतिरिक्त ही घुसखोरी करीत ठराविक रेतीसाठ्या व्यतिरिक्त हजारो ब्रास रेतीचे अवैध उत्खनन करून शेकडो वाहनांतून या चोरट्या रेतीची विल्हेवाट लावण्याचा गंभीर प्रकार चालवला असतांना स्थानिक तहसिलदार व महसुल प्रशासनातील अधिकारी/कर्मचारी त्यांना पाठबळ देत असल्यामुळे लोकप्रतिनिधींच्या विरोधाला ही जुमानले जात नसल्याचे निदर्शनास येत असून यापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद सदस्य आ.बाबाजानी दुर्रानी,गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी दिलेल्या तक्रारीला महसुल प्रशासनाने केराची टोपली दाखवली असतांनाच नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आ.विजय भांबळे यांनी जिल्ह्यातील रेती घाटांवर जिल्हा प्रशासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे लेखी स्वरूपात तक्रार देऊन जिल्ह्यातील रेती घाटांची ईटीएसद्वारे मोजनी करण्याची मागणी केली असून यावर जिल्हाधिकारी आंचल गोयल काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या