💥औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद-पोटूळ रेल्वे स्थानका दरम्यान देवगिरी एक्सप्रेसवर दरोडा....!


💥सिग्नल ला कपडा बांधून सिग्नल बंद करीत आठ ते दहा दरोडेखोरांनी घातला सशस्त्र दरोडा💥


औरंगाबाद (दि.२२ एप्रिल) - जिल्ह्यातील दौलताबाद-पोटूळ रेल्वे स्थानकादरम्यान सिग्नलला कपडा बांधून सिग्नल बंद करीत मुंबईकडे जाणाऱ्या सिकंद्राबाद-मुंबई देवगिरी एक्सप्रेसवर अबुलन्स मधून आलेल्या तब्बल आठ ते दहा दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घातल्याची घटना काल रात्री १२-०० ते १२-४५ वाजेच्या दरम्यान घडली आहे.


दरम्यान या घटनेत दरोडेखोरांना देवगिरी एक्सप्रेसच्या एस-५ व एस-९ या आरक्षित डब्यांवर तुफान दगडफेक केल्यामुळे प्रवासी वर्गात प्रचंड भातीचे वातावरण निर्माण झाले होते या घटनेत दरोडेखोरांनी प्रवासी वर्गाकडील पैसे दागदागीने मोठ्या प्रमाणात पळवल्याचे समजते वाळूज पोलीस यांनी करोडी ते रांजणगाव पोळ दौलताबाद पोलीस यांनी शरणापूर ते कासाबखेडा शिल्लेगाव पोलीस यांनी लासुर ते रांजणगाव पोळ व लासुर ते कासाबखेडा दरम्यान नाकेबंदी केल्यास आरोपी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही दरम्यान या घटनास्थळी एक अबुलन्स आढळून आल्याने दरोडेखोरांनी या दरोड्यात अंबुलन्सचा वापर केला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे यावेळी देवगिरी एक्सप्रेसच्या आरक्षित,प्रवासी कोच एस-०५ ते एस-०९ या डब्यावर तूफान दगड फेक झाली असे प्रत्यक्ष दर्शी प्रवास्यांनी सांगितलं मोठ्या प्रमाणात आरडाओरडा झाल्याने प्रवासी यांनी दरवाजा व खिडक्या बंद करून घेतल्याने बराच अनर्थ ठळला या घटने नंतर रेल्वे सुरक्षा बल औरंगाबाद चे अधिकारी दाखल झाले आहे तर मनमाड रेल्वे पोलीस व मनमाड रेल्वे सुरक्षा बल घटनेची माहिती घेत आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या