💥हिंगोली जिल्हा काँग्रेस पार्टीच्या जिल्हा अध्यक्षाचा शिवसेनेत प्रवेश...!


💥मुंबईत नगर विकासमंत्री मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बांधले शिवबंधन💥

शिवशंकर निरगुडे ; हिंगोली प्रतिनिधी 

हिंगोली (दि.३० एप्रिल) - मुंबई येथे आज शनिवार दि.३० एप्रिल २०२२ रोजी मुंबईत राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहें.


हिंगोली जिह्यात कळमनुरी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात वर्चस्व असलेले संजय बोंढारे यांनी सन 2007  मधे शिवसेनेला जय महाराष्ट्र करून कॉंग्रेसमधे प्रवेश केला होता त्यानंतर कॉंग्रेसच्या जिल्हाअध्यक्ष पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली होती या काळत त्यांनी कळमनुरी तालुक्यात कॉंग्रेसला अच्छे दिन दाखवले होते आखाडा बाळापूर येथील जिल्हा परिषद सदस्यांच्या विजया सोबतच त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीवर हि कॉंग्रेसचा झेंडा फडकवला होता जिल्ह्यात कॉंग्रेसची पाळेमुळे मजबूत कारणासाठी त्यांनी तत्कालीन खासदार राजीव सातव माजी आमदार संतोष टारफे यांच्या सोबत संपूर्ण जिल्ह्यात गाव गावपातळीवर कॉंग्रेस पक्ष वाढी साठी त्यांनी काम केले आहें....


मात्र मागिल काही दिवसात त्याची पक्षामध्ये चांगलीच चर्चा कूचबणा होऊ लागली होती त्यामुळे बोंढारे  शिवसेनेत प्रवेश करणार यांची जोरदार चर्चा सुरू झाली होती यामुळे वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे मन वाळवण्यासाठी प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला 

दरम्यान आज मुंबई येथे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर युवा सेना जिल्हा अध्यक्ष राम कदम यांच्या प्रमूख उपस्थितीत बोंढारे यांनी शिवबंधन बांधले यावेळी बाजार समितीचे माजी सभापती शेषराव बोंढारे माजी ग्रामपंचायत सदस्य संजय इंगळे यांची उपस्थिती होती 


बोंढारे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे कळमनुरी तालुक्यामधे शिवसेनेला आणखी मोठे पाठबळ मिळणार असल्याचे बोलले जात आहें आत्ता आखाडा बाळापूर ग्रामपंचायत कृषी उत्पन्न बाजार समीती शिवसेनेच्या ताब्यात आली आहें कॉंग्रेसकडे असलेला येहलेगाव तुकाराम जिल्हा परिषद गट व आखाडा बाळापूर जिल्हा परिषद गट पुन्हां शिवसेनेच्या ताब्यात आणण्यासाठी जोमाने प्रयत्न केले जाणार असल्याचे शिवसेनेच्या पदअधिकाऱ्यानि सांगितले


संजय बोंढारे हें राजीव सातव यांचे अगदी विश्वासु कार्यकर्ते होते पण आत्ता राजीव सातव यांचे निधन झाल्यामुळे अनेक कार्यकर्तेत्याचे कॉंग्रेस पक्षामधे मन लागत नाही जोपर्यंत राजीव सातव होते तो पर्यन्त हिंगोली जिल्ह्यातील कॉंग्रेसची वेगळीच ओळख निर्माण होती राजीव सातव यांचे निधन झाल्यामुळे पक्ष कडून राजीव सातव यांची पत्नी प्रज्ञा सातव यांना विधान सभेवर आमदार  घेतले आहें आणि सातव साहेवानि नेतृत्व देखिल करत आहेत 


हिंगोली जिल्ह्यातील कॉंग्रेसचे पक्षातील गटबाजी मुळे दुसऱ्या पक्षाना या गटबाजीचा फायदा होत आहें एक सातव साहेबाचा गट तर दुसरा भाऊ पाटील गोरेगावकर यांचा गट असे दोन गट हिंगोली जिल्ह्यात पाहायला मिळत आहेत 


माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे यांची कॉंग्रेस जिल्हा अध्यक्षपदी वर्णी लागणार का ? 

 कॉंग्रेसचे जिल्हाअध्यक्ष पद हें कोणत्या गटला मिळते ? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहें 


हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसा पासून कॉंग्रेसचे जिल्हाअध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू होत्या त्यासाठी माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे यांचे नाव अग्रस्थानी होते मात्र संजय बोंढारे यांना डावलून टारफे यांना जिल्हा अध्यक्ष पद देणे कठीण झाले होते आत्ता बोंढारे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे डॉक्टर संतोष टारफे यांचा जिल्हाअध्यक्ष पदाचा मार्ग मोकळा झाला आहें

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या