💥ताडकळस येथील १० वर्षीय आलिजा फिरोज पठाण व ९ वर्षीय जोबीया फिरोज पठाण या चिमुकल्यांनी धरला रोजा...!


💥ताडकळस पंचक्रोषीतील सर्व नागरिकांसह आप्त नातेवाईका कडून या चिमुकल्यांचे कौतुक होत आहे💥

पुर्णा : तालुक्यातील ताडकळस येथील १० वर्षीय अलिजा फिरोज खान पठाण व ०९ वर्षीय जोबीया फिरोज खान पठाण या दोन्ही चिमुकल्या बहिणींनी आज रविवार दि.१७ एप्रिल २०२२ रोजी रमजान महिन्याचा रोजा (उपवास) धरला. 

सध्या एप्रिल महिन्याचा कडकडीत उन्हाळा सुरु असून ४६ डिग्री सेल्सियस तापमान आहे आणि अश्या कडकडीत तापमानात पाण्या अभावी माणसाचा जीव तगमग होत आहे तरीही या दोन्ही चिमुकल्या बहिणींनी रोजा धरला म्हणून ताडकळस पंचक्रोषीतील सर्व नागरिकांसह आप्त नातेवाईका कडून या चिमुकल्यांचे कौतुक होत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या