💥पुर्णा शहरात महामानव बोधिसत्व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी...!


💥हजारोंच्या संख्येने उपस्थित निळ्या सागराने केले महामानव परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन💥


पुर्णा : शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्यास सकाळी ०९-०० वाजता पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले भिक्खुसंघाने त्रिशरण पंचशिल ग्रहण करण्यात आले या नंतर प्राचार्य मोहन मोरे यांच्या हस्ते धम्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले त्या नंतर ९-३० वाजता प्लाट फाम क्र.४ रेल्वे स्टेशन परिसर येथे रेल्वे रिटायर्ड मजूर नेते आशोक कांबळे याच्या हस्ते धम्मध्वजाचे ध्वजारोह करण्यात आले त्या नंतर ११ वा बुद्ध विहार पूर्णा येथे भदंत डॉ. उपमुप्त महाथेरो यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर दुपारी १२-०० वाजता डॉ. आंबेडकर नगर येथे जयंती मंडळाचे अध्यक्ष गणेश सोनुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यानंतर मिरवणूक प्रारंभी भव्य रथामधील डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस नायब तहसिलदार नितेशकुमार बोलेलो नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय नरळे पोलिस निरिक्षक सुभाषचंद्र मारकड यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. 


यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य जयंती मिरवणूकी मध्ये पारंपरिक वेषभुषेतील मुलींचे लेझीम पथक छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आबेडकर आदी महापुरूषांचे सजीव देखाने करण्यात आले होते सायंकाळ पर्यंत अत्यंत शिस्तबद्ध पध्दतीने परमपुज्य बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करीत  मिरवणूक सुरु होती यावेळी प्रमुख उपस्थिती भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो,भन्ते बोधीधम्मा,भन्ते पंयावंश,भन्ते संघरत्न,प्राचार्य मोहन मोरे,यादवराव भवरे,रिपाईचे जेष्ठ नेते प्रकाश कांबळे,माजी नगरसेवक आशोक धबाले,माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक उत्तम खंदारे,नगरसेवक दादाराव पंडित,नगरसेवक ॲड.धम्मा जोंधळे,ॲड.हर्षवर्धन गायकवाड,नगरसेवक अनिल खर्गखराटे,नगरसेवक मधूकर गायकवाड,जेष्ठ नेते महेबूब कुरेशी,नगर सेवक विरेश कसबे,नगरसेवक मुकूंद भोळे जयंती मंडळाचे अध्यक्ष गणेश सोनुले,श्रीकात हिवाळे,शामराव जोगदंड,दिलीप हनुमंते,दिलीप गायकवाड,ॲड.महेंद गायकवाड,कामगार नेते आशोक व्ही.कांबळे साहेबराव सोनवणे,पी.जी रणवीर,किशोर ढाकरगे,रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष राजकुमार सुर्यवंशी,बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे,पत्रकार विजय बगाटे,पत्रकार अमृत कऱ्हाळे,युवा नेते रवी गायकवाड,प्रविण गायकवाड,निशांत दुधे,शेखर गवळी आदींसह प्रचंड संख्येने माता-भगिनींसह जनसमुदायाची उपस्थिती होती..


💥पुर्णा पोलिस प्रशासनाची भुमिका अभिनंदनास्पद :-


पुर्णा पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक सुभाषचंद्र मारकड यांनी श्रीराम नवमीसह महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती शांततेत व उत्साहपुर्ण वातावरणात पार पडावी याकरिता नियोजनबध्द पध्दतीने उपाययोजना केल्याचे निदर्शनास येत असून शहरासह तालुक्यात सन उत्सवांसह महापुरूषांच्या जयंती दरम्यान ड्राय डे च्या दिवशी मोठ्या प्रमाणात विकल्या जाणाऱ्या अवैध देशी विदेशी दारूला लगाम लावण्याचे महत्वपुर्ण कार्य करीत प्रथमतः अवैध देशी-विदेशी दारू विक्रेत्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाच नाही त्याही पेक्षा महत्वाची बाब म्हणजे पो.नि.मारकड यांनी स्वतः जयंती महोत्सव मिरवणूकीत सहभाग घेऊन तरुणांसोबत नृत्य करीत त्यांना प्रोत्साहन दिल्याने मिरवणूक अत्यंत शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली त्यामुळे त्यांचे व समस्त सहकारी पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांचे तसेच महिला पोलिस कर्मचाऱ्यांचे सार्वजनिक भिम व बुध्द जयंती मंडळासह जनसामान्यांतून ही कौतुक होत आहे....   


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या