💥सुरळीत विज राहण्यासाठी ट्रांन्सफार्मरला कुलरची थंड हवा......!


💥नर्सी महावितरण कर्मचाऱ्यांनी लढवली अनोखी शक्कल💥

 शिवशंकर निरगुडे - हिंगोली प्रतिनिधी

हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथील ३३ के व्ही विज उपकेंद्रामधील विज सुरळीतपणे सुरू राहावी यासाठी ट्रांन्सफार्मरला कुलरची थंड हवा देण्याची अनोखी शक्कल महावितरण कर्मचाऱ्यांनी लढवली आहे.

सध्या मोठ्या प्रमाणावर तापमानात वाढ झाली असून  उच्च तापमानामुळे विजेच्या ट्रांन्सफार्मर मधील ऑइल गरम (ओव्हर हीट) होत असल्याने विजपुरवठा ही वारंवार खंडित होण्याचा प्रकार वाढला होता यामुळे ग्राहकांच्या तक्रारीमध्ये वाढ झाली होती.मात्र अशातच विजपुरवठा सुरळीतपणे सुरू राहावा यासाठी नर्सी येथील महावितरण कर्मचाऱ्यांनी ५ MVA विजेचे ट्रांन्सफार्मर समोर कुलर लावून थंड हवा देण्याची अनोखी शक्कल लढवली आहे.

कुलरची थंड हवा देऊन  ट्रांन्सफार्मरचे तापमान संतुलित ठेवण्यास मदत होत असल्याने या अनोख्या पद्धतीमुळे विजेचे ट्रांन्सफार्मर थंड होत असून येथील दोन ५ एम व्ही ए ट्रांन्सफार्मर मधून जवळपास २५ गावांचा विज पुरवठा सध्या तरी सुरळीतपणे सुरू असल्याचे येथील अभियंता आत्राम यांनी सांगितले.यासाठी येथील कर्मचारी अमोल पातळे,अमोल वानरे,मुजीब सय्यद,शेख सलमान हे परिश्रम घेत आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या