💥पुर्णा येथील स्वातंत्र्य सैनिक सुर्यभानजी पवार महाविद्यालयात करिअर कट्टा उपक्रमाचे आयोजन....!


💥या उपक्रमात स्पर्धा परीक्षा व व्यवसाय यावर मार्गदर्शन होणार आहे💥

पूर्णा (दि.२७ एप्रिल) - येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात दिनांक २८ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता आयसीटी कक्षात करियर कट्टा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालय,पूर्णा (जं) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करियर कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी या उपक्रमात स्पर्धा परीक्षा व व्यवसाय यावर मार्गदर्शन होणार आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक सचिव प्रोफेसर डॉ रामेश्वर पवार हे उपस्थित राहणार असून उदघाटक अधिसभा सदस्य प्रा.गोविंद कदम तर प्रमुख मार्गदर्शक जिल्हा समन्वयक प्रोफेसर डॉ.श्रीधर कोल्हे,डॉ.डी. बी.रोडे,प्रोफेसर डॉ.टी.व्ही.मुंडे, प्राचार्य डॉ के.राजकुमार हे उपस्थित राहणार आहेत.असे कार्यक्रमाचे संयोजक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ संतोष कुऱ्हे व समन्वयक प्रा.डॉ. विजय भोपाळे यांनी केले आहे.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या