💥जिंतूर जालना महामार्गावरील जोगवाडा पाटीजवळ उसाचा ट्रक उलटला दोन जण जखमी...!


💥परिसरातील नागरिकांच्या मदतीने जखमींना जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले💥

जिंतूर प्रतिनिधी /  बि.डी. रामपूरकर

जिंतूर जालना महामार्गावरील जोगवाडा पाटीजवळ उसाचा ट्रक पलटी झाल्याची घटना आज मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. यामध्ये ट्रकचालक व त्यासोबतचा एक जण जखमी झाला आहे. परिसरातील नागरिकांच्या मदतीने जखमींना जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की जालनाकडून जिंतूरकडे ऊस घेऊन जाणारा ट्रक क्रमांक एम. एच. 09  सी. डब्लू.9288 हा जोगवाडा पाटी जवळील वळणावर आला असता, चालकाचा ट्रक वरील अचानक ताबा सुटल्याने, ट्रक रस्त्यावर पलटी झाला. यामध्ये ट्रक चालक व त्याच्यासोबत असलेला एक जण जखमी झाला आहे. जखमींना जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ऐन रस्त्यावर ट्रक पलटी झाल्याने महामार्गावर तब्बल एक तास वाहतूक ठप्प झाली होती. चारठाणा पोलीस व महामार्ग पोलिसांच्या मदतीने सदर अपघातग्रस्त ट्रक रस्त्याच्या कडेला येऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली. सदर अपघातामध्ये जखमी झालेल्यांची नावे मात्र समजू शकली नाही....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या