💥सार्वजनिक भिम जयंती उत्सव समितीच्या वतीने महाजलसाचे आयोजन....!


💥शाहीर शीतल साठे व सचिन माळी यांचा प्रबोधनात्मक गाण्यांचा कार्यक्रम💥


✍🏻फुलचंद भगत

मंगरूळपीर :- स्थानिक मंगरूळपीर तालुक्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते जयंतीच्या अनुषंगाने शहरात प्रबोधनपर गाण्यांचा कार्यक्रम प्रसिद्ध शाहीर शीतल साठे व सचिन माळी यांचा नवयान महाजलसा कार्यक्रम दि. 20 एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे संध्याकाळी सहा वाजता आयोजित केला आहे.

 सदर कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.वनपरिक्षेत्र अधिकारी सिद्धार्थ देवरे यांना बोलवण्यात आले उद्घाटक म्हणून डॉ. सिद्धार्थ देवळे यांना आमंत्रित केले कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे व उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे व मानसोपचार तज्ञ डॉ.नरेश इंगळे व समाजकल्याण सभापती वनिता देवरे यांची उपस्थिती राहणार आहे  यावेळी कार्यक्रमाचे आयोजक युवा नेते सौरभ सपकाळ, ऊपसभापती गजानन इंगोले,विनोद भगत,जनार्दन बेलखडे,गौतम खाडे यांनी सदर कार्यक्रमाची माहिती दिली....

प्रतीनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या