💥परळी तालुक्यातील सेलू शाहूनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.....!


💥कार्यक्रमाचे उद्घाटन सेलू शाहूनगर चे सरपंच गंगाधर सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले💥                             

परळी (दि.२६ एप्रिल) सेलू शाहूनगर तालुका परळी वैजनाथ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 129वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असल्याची माहिती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नामदेव कांबळे यांनी दिली आहे.             

याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी तालुक्यातील सेलू शाहूनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती साजरी करण्यात आली असून या जयंती उत्सवानिमित्त सकाळी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण दाऊतपुरचे सरपंच कांता भाऊ फड यांच्या हस्ते तर कार्यक्रमाचे उद्घाटन सेलू शाहूनगर चे सरपंच गंगाधर सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची पूजा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब जगतकर यांच्या हस्ते करण्यात आली. तर या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष गौतम भाई आगळे जिल्हा उपाध्यक्ष प्रसेनजित रोडे युवक जिल्हा उपाध्यक्ष गौतम भाऊ साळवे बहुजन आघाडीचे युवक जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव रोडे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संजय भाऊ गवळी तालुका महासचिव विष्णुपंत मुंडे तालुका संघटक सुभाषराव रोडे युवक नेते राजेश सरवदे युवक नेते बाळासाहेब सपकाळ धम्मानंद बचाटे महादू गीते एकनाथ चांगीरे. इत्यादी उपस्थित होते तर या कार्यक्रमाप्रसंगी सेलू येथील बालिका कोमल बचाटे अक्षदा घोबाळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भाषण केले तर याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष गौतम भाई आगळे प्रसंजीत रोडे संजय भाऊ गवळी इत्यादीची समयोचित भाषणे झाली असून या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन भारतीय बौद्ध महासभेचे दत्तात्रेय बचाटे यांनी मानले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या