💥जिंतूर येथे महावीर जयंती निमित्त शोभायात्रा व धार्मिक कार्यक्रम संपन्न...!


💥या शोभायात्रेत घोडे रथ यांचा देखावा सादर केला होता💥

जिंतूर प्रतिनिधी /  बि.डी. रामपूरकर

जिंतूर येथे भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त महावीर मंदिर येथून शोभायात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात जैन स्तंभ येथे धरमचंद अच्छा यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

 या शोभायात्रेत घोडे रथ यांचा देखावा सादर केला होता. शोभायात्रा महावीर मंदिर येथे आल्यानंतर धन्यकुमार सावजी, चंद्रकांत सावजी, बबनराव बेंडसुरे व पराग सावजी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यागी भवन येथील प्रांगणात शांतिनाथ विधान ,रात्री महाआरती व सांस्कृतिक कार्यक्रम झाले. याप्रसंगी आमदार मेघना साकोरे बोर्डीकर उपस्थित होत्या कार्यक्र यशस्वीतेसाठी पराग सावजी, रोहन मोहारे, वैभव सावजी ,अनिकेत वरखेडकर, अनिरुद्ध जिंतुरकर,प्रेमसुख बोराळकर आदींनी प्रयत्न केले. शोभायात्रेत महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या