💥डाकूपिंप्री वाळू घाटात नियमबाह्य वाळू उपसा ; सहा पोकलेन मशिनचा वाळू उपशा साठी वापर....!


💥हजारो ब्रॉस वाळू पात्रा बाहेर ; महसुल प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष💥 किरण घुंबरे पाटील

पाथरी (दि.२६ एप्रिल) :- तालुक्यात डाकूपिंप्री एथील एकमेव वाळू घाटाचा लिलाव या वर्षी झाला असून परभणी येथील के एम सी एजन्सी अॅन्ड कन्सल्टींग या एजन्सीला सहा हजार ब्रॉस वाळू उपसण्या साठी परवानगी मिळालेली असतांना या एजन्सीने आता पर्यंत दिवस रात्र सहा पोकलेन मशीनचा वापर करत गोदा पात्रातून हजारो ब्रॉस वाळूचा नियमबाह्य उपसा केला असल्याचे निवेदन परभणी जिल्हाधिका-यां सह महसुल मंत्र्यांना देऊन येथील नियमबाह्य वाळू उपसा बंद करण्याची मागणी केली आहे.


सदरील एजन्सी धारकाने मोजमापा पुर्वीच वाळू उपसण्यास सुरूवात केली असून वाळू घाट सुरू करण्या पुर्वी तहसिल आणि भूमीअभिलेख कार्यालया कडून मोजनी होणे गरजेचे असते मात्र असा प्रकार न होता येथून थेट पोकलेन च्या साह्याने दिवस रात्र वाळू उपसा होत असल्याचे म्हटले आहे.या ठिकाणी ग्रामपंचायत ची पाणी पुरवठ्याची विहिर आहे.या गटातून रेती उपसा करता येत नसतांना या ठिकाणाहून जवळपास चार हजार ब्रॉस वाळू उपसा करण्यात आलेला असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. या ठिकाणी सहा हजार ब्रॉस वाळूचा लिलाव झालेला असतांना जवळपास विस हजार ब्रॉस वाळू उपसा ठेकेदाराने नियमांची पायल्ली करत केल्याचे नमुद करण्यात आले आहे. हा प्रकार प्रशासनाला हाताशी धरुनच केला जात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. नदी पात्रातून  रेती उपसा करत असतांना तो मनुष्यबळाने करणे आवश्यक असतांना अटी आणि शर्थींचा भंग करत सहा मोठ मोठ्या पोकलेन मशिन चा वापर करून नदि पात्रातून दिवस रात्र वाळू उपसल्या जात आहे. रात्री च्या वेळी दोन पोकलेन मशिन व्दारे हायवा व्दारे रेती पात्रा बाहेर आणली जात असून दिवसा चार पोकलेन व्दारे तीन ते पाच ब्रॉस वाळू हायवा आणि ट्रक व्दारे उचली जात आहे.या ठिकाणी सेक्शन बोट चा वापर ही वाळू उपशा साठी केला जात आहे.संबंधित अधिकारी अर्थपुर्ण दर्लक्ष करत असल्याचे ही नागरीक सांगत आहेत. वाळू उपशा साठी यांत्रीक साधने वापरल्यास ते जप्त करण्याचा अधिकार प्रशासनास असतांना या प्रकारा कडे जाणिव पुर्वक दर्लक्ष केल्या जात असल्याचे ही या निवेदनात म्हटले आहे. येथील वाळू उत्खनन करताना संबंधीत एजन्सीने सर्वाेच्च न्यायालय आणि हरीत लवादाचया निर्देशांचा भंग केला असून या विषयी गावातील नागरीकांना ही संबंधित एजन्सी धारक धमकावत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पाथरी तहसीलदारांनी पंचनामा करून सदरील गुत्तेदार हा केनीयंत्राचा वापर वाळू उपशा साठी करत असल्याचा अहवाल देत घाटा मध्ये पाणी असतांना अटी व शर्थीचा भंग करत वाळू उपसा सुरू असल्याचा पंचनाम्याव्दारे तहसीलदरांनी अहवाल सादर केल्याचे या निवेदनात म्हटले असुन या पुर्वी अशाच प्रकारे वाळू उपसा झाल्याने महिला आणि लहान मुलाचा नदिपात्रातील खड्यात पाण्याचा अंदाज न आल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. येथील वाळू घाटात होणारा हा अवैद्य वाळू उपसा बंद करावा अशी मागणी परभणी जिल्हाधिकारी आणि राज्याचे महसुल मंत्री यांना निवेदना व्दारे गौतम विश्वनाथ घाटे,प्रदिप प्रकाश घाटे यांनी केली असून या विषयीचे नोट कॅम फोटो ही परभणी जिल्हाधिका-यांना पाठवण्यात आले आहेत. आता जिल्हाधिकारी गोयल या कामी कोणती पावले उचलणार या कडे संपुर्ण पाथरी तालुक्याचे लक्ष लागून राहिलेआहे. अशा नियमबाह्य वाळू उपशा साठी या पुर्वीचे जिल्हाधिकारी पि शिवाशंकर कठोर पावले उचलत असत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या