💥पुर्णा तालुक्यात लोकप्रतिनिंधींच्या विरोधाला न जुमानता महसुल प्रशासनातील भ्रष्ट नौकरशहांचे रेती तस्करांशी हितसंबंध....!


💥महसुल प्रशासनाच्या नियमांची खुलेआम पायमल्ली ; रेती लिलावधारकांना जेसीबी वापरास दाखवला हिरवा कंदील💥

पुर्णा (दि.२० एप्रिल) - तालुक्यातील पुर्णा-गोदावरी नदीपात्रातील वैध/अवैध रेती धक्यांमुळे पर्यावरणासह कृषी उद्योगाला सुध्दा फिर मोठा धोका निर्माण झाला असून यास सर्वस्वी महसुल प्रशासनात कार्यरत भ्रष्टाचारी नौकरशहाच जवाबदार असून वैध/अवैध रेती तस्करांच्या खाल्ल्या अन्नाला जागणारे महसुल प्रशासनातील' भ्रष्ट अधिकारी/कर्मचाऱ्यांनी जनुकाही कंबरेचे सोडून डोकश्याला गुंडाळले की काय ? असा गंभीर प्रश्न जनसामान्यांसह लोकप्रतिनिधींमध्ये सुध्दा उपस्थित होत असून गौण खनिज रेती तस्करांसह प्रशासकीय नियमांची पायमल्ली करणाऱ्या रेती घाट लिलावधारकांकडून मिळणाऱ्या लाखों रुपयांच्या घुसी मुळे मुजोर झालेल्या महसुल प्रशासनातील गँग आता लोकप्रतिनिधींच्या विरोधाला ही जुमानत नसल्याचे निदर्शनास येत आहे.


मागील १० एप्रिल २०२२ रोजी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मातब्बर नेते तथा आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी राज्यातील महसुल मंत्रालयातील सचिव यांनी लेखी स्वरूपात तक्रार देऊन परभणी जिल्हा महसुल प्रशासनातील अधिकारी/कर्मचारी यांची गँगच वैध/अवैध रेती उत्खनन व तस्करीला प्रोत्साहन देऊन रेती तस्करांशी आर्थिक हितसंबंध जोपासत महसुल प्रशासनाच्या नियम व अटींची कश्या प्रकारे पायमल्ली करीत आहे याची सविस्तर माहिती दिली होती परंतु अद्याप पर्यंत त्यांनी केलेल्या तक्रारीसह पुर्णा-पालम-गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.रत्नाकर काका गुट्टे यांनी केलेल्या तक्रारीला तहसिलदार पल्लवी टेमकर यांच्यासह महसुल प्रशासनाने केराची टोपली दाखवल्याचे निदर्शनास येत आहे. 

पुर्णा-पालम-गंगाखेड विधानसभा मतदार संघातील अवैध रेती तस्करीत सर्वात आघाडीवर असलेल्या पुर्णा तालुक्यातील पुर्णा-गोदावरी नदीपात्रांतील अनेक अवैध रेतीघाटांसह पिंपळगाव बाळापूर,संदलापूर,कानखेड आदी गावांतील अधिकृत रेती घाटांवर जेसीबी मशीन यंत्रांद्वारे रात्रंदिवस रेतीचे प्रचंड प्रमाणात उत्खनन होत असून या रेतीची मोठ्या प्रमाणात वाहतूक तस्करी होत असतांना महसुल प्रशासन गाढ झोपेत आहे की झोपेचे सोंग घेत आहे ? असा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत असून बाळापूर,संदलापूर,कानखेड आदी गावांतील अधिकृत रेती घाटांना सुरूवात होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटत असतांना व संबंधित रेती घाटांवर रात्रंदिवस बेकायदेशीररित्या दोन ते तिन जेसीबी मशीनच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन होत असतांना स्थानिक तहसिलदार व महसुल प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी धृतराष्ट्र वृत्तीचा अवलंब करून रेती तस्कररूपी कौरवांना पुर्णा-गोदावरी नद्यांचे वस्त्रहरण केल्याप्रमाणे अक्षरशः लुटमार करण्याची सुवर्णसंधी देत असल्याचे निदर्शनास येत आहे.

महसुल प्रशासनाने रेती घाट लिलावधारकांसाठी लागू केलेल्या तब्बल १०२ अटी व नियमांची यत्किंचितही अंमलबजावणी होत नसून या रेती घाटांवर अद्यापही सीसीटीव्ही बसवण्यात आलेल्या नसून सिसीटीव्ही बसवून सलग त्याचे फुटेज करणे बंधनकारक आहे. परंतु तालुक्यासह जिल्ह्यात सीसीटीव्ही फुटेज कुठेही होत नाही. झाले तर फुटेज काही काळाकरीता खंडीत किंवा बंद ठेवला जातो आहे, असे आमदार दुर्राणी यांनी दिलेल्या महसुल सचिवांना दिलेल्या तक्रारीत ही नमूद करण्यात आले असून आ.दुर्रानी यांनी रेती उत्खननापाठोपाठ वाळू वाहतूकीतील अंदाधूंदही निदर्शनास आणली. स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदा तहसीलदार, उपजिल्हाधिकारी हे आर्थिक हितसंबंध जोपासत या सगळ्या गोष्टींकडे सर्रास दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोपही आ.दुर्रानी यांनी केला.परंतु अद्यापही जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी आ.दुर्रानी व आ.गुट्टे यांच्या तक्रारींची गंभीरपणे दखल घेतली नसल्याचे निदर्शनास येत असून पुर्णा तालुक्यातील पिंपळगाव बाळापूर,संदलापूर,कानडखेड या रेती धक्यांच्या ठराविक क्षेत्रांची मोजणी करून निर्धारीत रेतीसाठ्या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात झालेल्या उत्खनन प्रकरणी संबंधित रेती घाट लिलावधारकांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर आर्थिक दंडात्मक कारवाई करून त्यांचा काळ्या यादीत समावेश करावा अशी मागणी होत आहे.......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या