💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या हेडलाईन्स.....!


💥धार्मिक स्थळांवरील भोंगे हटणार नाहीत,प्रत्येकाने आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये,याची काळजी घेतली पाहिजे - गृहमंत्री💥

 ✍️ मोहन चौकेकर

 *सोलापूरमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा कार्यक्रम ;आठ हजार कोटींच्या चार महामार्गांचे नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण

*यवतमाळ-नागपूर मार्गावरील भारी विमानतळाजवळ भरधाव वाहनाने वृद्ध दाम्पत्याला उडवले,वृद्ध दाम्पत्याचा जागीच मृत्यू

*वर्ध्यातील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरगुती सिलेंडरचा स्फोट ; स्फोटात अकरा वर्षीय चिमुकली गंभीर जखमी 

*यवतमाळमधील महागाव, उमरखेड तालुक्यात अवकाळी पाऊस, ज्वारी, भुईमूग आणि हळद,तीळ, टरबूज पिकांचे नुकसान

*केंद्र सरकारकडून राज्य सरकारला जॅकपॉट!* केंद्र सरकारने सिडबी क्लस्टर डेव्हलपमेंट फंड अंतर्गत राज्य सरकारला 600 कोटी रुपयांचा निधी मंजुर

*धार्मिक स्थळांवरील भोंगे हटणार नाहीत,प्रत्येकाने आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये,याची काळजी घेतली पाहिजे, सर्वपक्षीय बैठकीनंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची घोषणा

*किरीट सोमय्यांवर शनिवारी रात्री शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यानंतर भाजपचं शिष्टमंडळ आज दिल्लीत केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांची भेट घेणार 

*भोंग्यासंदर्भात राज्य सरकारची आज सर्वपक्षीय बैठक, राज ठाकरे उपस्थित राहणार नाहीत ; सर्वच प्रार्थनास्थळांसाठी लवकरच मार्गदर्शक सूचना जाहीर होणार* 

*सातारा जिल्ह्यातील शिवाजीनगर येथे शिलनाथाच्या डोंगरावर यात्रेसाठी मंदिरात जाणार्‍या भाविकांवर मधमाश्यांचा अचानक हल्ला ; धावपळीत शाळकरी मुलाचा दरीत पडून मृत्यू 

*पंतप्रधान मोदींच्या घरासमोर हनुमान चालिसा, नमाज पठण करु द्या,राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची मागणी

*मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतूकीसाठी आजपासून 25 एप्रिल पासून 25 मे पर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत या वेळेत सहा तास घाट बंद असणार

*किरीट सोमय्यांवर हल्ला ; देवेंद्र फडणवीसांचे केंद्रीय गृहसचिवांना पत्र, मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप

*ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात आज महत्वाची सुनावणी,सुनावणीवर निवडणुकांचं भवितव्य 

*येत्या पाच दिवसांमध्ये राज्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट येईल तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असेल

*सोलापुरातल्या प्रिसिजन ग्रुपने बनवलेल्या इलेक्ट्रिक बसमधून गडकरींची सफर

*ज्येष्ठ संगीतकार, गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल

*भोंग्यांच्या मुद्द्यावर आयोजीत सर्वपक्षीय बैठकीस मुख्यमंत्री राहणार गैरहजर ; फडणवीसही जाणार नाहीत

*मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक, सर्वपक्षीय बैठकीत मनसे काय भूमिका घेणार ?

*''ऊर्जामंत्र्यांना केवळ 'नाश्ता' न दिल्यानेच अतिरिक्त लोडशेडिंग" कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा ऊर्जामंत्र्यांनाच घरचा आहेर

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या