💥औरंगाबाद येथील मनोज आव्हाड यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ फाशीची शिक्षा द्या...!


💥मानवहित लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड यांनी केली मागणी💥 

परभणी/पुर्णा (दि.२५ एप्रिल) - औरंगाबाद येथील 27 वर्षीय युवक मनोज शेषराव आव्हाड यांची दि.20 एप्रिल 2022 रोजी चार-पाच लोकांनी बेदम मारहाण करून निर्घुन हत्या केली आहे. त्याच्या निषेधार्थ आज सोमवार दि.25 एप्रिल 2022 रोजी पूर्णा तहसील कार्यालय मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे व गृहमंत्री श्री. दिलीप वळसे पाटील यांना मानवहीत लोकशाही पक्षातर्फे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदना मार्फत हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टामध्ये हे  चालवुन आरोपींना त्वरित फाशी देण्यात यावी. मनोज आव्हाड यांच्या कुटुंबाला 25 लाख रुपये आर्थिक मदत करण्यात यावी. मनोज आव्हाड यांच्या पत्नीला शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे.आरोपींची संपत्ती जप्त करण्यात यावी अशा विविध मागण्या करण्यात आले आहेत.

सदरील निवेदनावर मानवहीत लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तालुकाध्यक्ष संजय शिंदे, इंजि.गाजी सलमान ( जिल्हा कार्यकारणी सदस्य परभणी) लाल सेनेचे प्रवक्ते प्रकाश गायकवाड,वाल्मिकी आर्मीचे  सुमित चावरे, दिपक बुरड, श्याम खंदारे ,इंजि.आकाश गायकवाड, सुमित गायकवाड,अनिल गायकवाड,संजय अंभोरे, बंटी गायकवाड,साईनाथ आंबोरे,संजय आडबाल,गणेश गायकवाड,नागेश सरोदे,अविनाश गायकवाड आदीसह बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या