💥जिंतूर-परभणी रस्त्यावर एसटी बस-टाटा सुमोच्या भीषण अपघातात युवक ठार....!

💥या घटनेत टाटा सुमो चालक सुनील अंभोरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे💥

जिंतूर प्रतिनिधी /  बी.डी. रामपूरकर

जिंतूर : शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या जिंतूर-परभणी रोड वरील पांगरी पाटीजवळ एसटी बस व टाटा सुमो यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तालुक्यातील कडसावंगी येथील २८ वर्षीय युवक जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दि.२१ च्या रात्री १० च्या सुमारास घडली. तालुक्यातील कडसंगी येथील सुनील दत्‍तराव अंभोरे वय २८ हा टाटा सुमो क्रमांक एम एच २८ डी.५७७७ वाहन घेऊन परभणीच्या दिशेने जात असताना पांगरी पाटीजवळ परभणी हुन जिंतूर कडे येणारी बस क्रमांक एम.एच २० बी एल १७७७ यांच्यात समोरासमोर जोराची धडक होऊन भीषण अपघात झाला. यात टाटा सुमो चालक सुनील अंभोरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

              अपघाताची भीषणता इतकी होती की चालकाचा मृतदेह स्टेरिंग मध्ये फसला होता. पोलीस व सामाजिक कार्यकर्ते नागेश आकात रुग्णवाहिका चालक विजय राठोड यांनी तब्बल एक तास प्रयत्न करून अपघातग्रस्त बस बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले डॉ.हनीफ खान, सिस्टर गावित यांनी तपासून मृत घोषित केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या