💥पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळीचे विद्यमान सरपंच शिवाजी साखरे यांच्यावर सशस्त्र हल्लेखोरांनी केला जिवघेणा हल्ला...!


💥हल्ला राजकीय सुडसत्रातून की रेती व्यवसायातून : कारण अद्यापही अस्पष्ट💥

पुर्णा : तालुक्यातील मौ.धनगर टाकळी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच शिवाजी कोंडीबा साखरे वय ४५ वर्षे  यांच्यावर पुर्णेहून आपली काम आटोपून भाटेगाव शिवारातून आपल्या एम.एच-२२ ४७४७ एआर या मोटारसायकलने सहकारी अंगद आबाजी साखरे पोलिस पाटील पोलिस पाटील भास्कर म्हात्रे यांच्या सोबत धनगर टाकळी या आपल्या गावाकडे जात असतांना काल शुक्रवार दि.२९ एप्रिल २०२२ रोजी रात्री ११-०० वाजेच्या सुमारास समोरून आलेल्या अज्ञात चार ते पाच सशस्त्र हल्लेखोरांनी त्यांना रस्त्यात अडवून सरपंच शिवाजी साखरे यांच्यावर चाकुहल्ला चढवला यावेळी सोबत असलेल्या पोलिस पाटील म्हात्रे,अंगद साखरे यांनी हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला यावेळी हल्लेखोरांनी यांच्या जवळील मोबाईल व अन्य वस्तू हिसकावून घेतल्या या घटनेत सरपंच साखरे यांच्यासह हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या अंगद साखरे हे गभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान या हल्ल्या मागील खरे कारण धनगर टाकळी येथील गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अवैध रेती तस्करीतील वाद की राजकीय विवाद याचा सखोल तपास तर आता पोलिस यंत्रणाच करणार असून या घटने संदर्भात सरपंच साखरे यांनी दिलेल्या तक्रारी वरून अज्ञात हल्लेखोरां विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या