💥कला शिक्षण दिलीप दारव्हेकर यांनी रांगोळीतून दिली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना...!


💥रांगोळी रंगाची उधळण करुन महामानवाला दिली वंदना💥



 
 शिवशंकर निरगुडे ; हिंगोली प्रतिनिधी

मातोश्री सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालय,कवडा  तालुका कळमनुरी जि.हिंगोली येथिल कला शिक्षक दिलीप दारव्हेकर यांनी रांगोळीतून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली आहें  भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्याध्यापक एस टी वानखडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ग 7 वी मधील नेहा,ज्योती,नियती,वैष्णवी,आश्विनी,ऐश्र्वर्या,पुजा, समिक्षा,वैशाली,शितल या विद्यार्थिनी आणि कलाशिक्षक दिलीप दारव्हेकर यांनी साकारली भव्य रांगोळी 6 X 8 आकारातील भव्य रांगोळी कोरोना च्या प्रदीर्घ सुट्टी नंतर पहिल्यांदाच विद्यार्थ्यांच्या अतिशय आनंदी आणि उत्साही वातावरणात निर्माण झाले आहें.


रांगोळी रंगाची उधळण करुन बाबासाहेबांना वंदना केली आहे सम्राट ढेपे सर, चव्हाण सर, ढेंगळे सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे कला शिक्षक दारव्हेकर नेहमीच अश्या महापुरुषाच्या जयंती निमित्ताने रांगोळी आणि व्यंगचित्रे काढतात त्यामुळे विध्यार्थी यांच्या मधे उत्साह निर्माण होतो बाबासाहेबांच्या अभ्यास करतांना विध्यार्थी मधे आदर्श निर्माण व्हावा हा उद्देश या रांगोळीतून रेखाटनातून साध्य होईल....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या