💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या हेडलाईन्स.....!


💥जागर शेतकऱ्यांचा आकोश महाराष्ट्राचा' अभियान आजपासून सुरु,सिंधुदुर्ग किल्ल्यावरुन सदाभाऊ खोत करणार एल्गार💥

✍️ मोहन चौकेकर

*विदर्भातील नागपूर,वर्धा,चंद्रपूर,अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट राहणार ; हवामान विभागाने दिला इशारा   

*'जागर शेतकऱ्यांचा आकोश महाराष्ट्राचा' अभियानाला आजपासून सुरुवात, सिंधुदुर्ग किल्ल्यावरुन सदाभाऊ खोत करणार एल्गार

*शिवसेना खासदार भावना गवळींना ईडीचं समन्स, पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

 *मंदिर समितीचा सावळा गोंधळ सुरूच ; विठ्ठलभक्तांना प्रसादाचा लाडू मिळत नसल्याने संतप्त, लाखोंचं नुकसान

*किसान रेल्वे तात्पुरत्या बंद करण्याचा निर्णय,शेतमालाच्या वाहतुकीची गैरसोय होत असल्यानं शेतकऱ्यांची नाराजी

*कोल्हापूरसह सिंधुदुर्गमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा

*अन्नाच्या शोधात परदेशी पक्षी सांगोल्यात माण नदीपात्रात चित्रबलाक पक्षाचे थवेच्या थवे

*एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असताना सीएनजीच्या दरातही वाढ झाली आहे. नाशिकमध्ये सीएनजीचे दर 80 रुपये प्रति किलो आहेत

 *कोकणात शिवसेना उमेदवाराच्या पराभवाला शिवसेनेतील नेताच कारणीभूत ? सामंतांच्या 'त्या' वक्तव्यावरुन चर्चा

*सध्या बाजारपेठेत कांद्याला चांगला दर मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे.कांद्याचे दर घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे

*लोकल प्रवाशांसाठी खूशखबर, मुंबईतील एसी लोकलचे तिकीटाचे दर ५० टक्क्यांनी केले कमी, पासचे दर…एसी लोकलचे तिकीटाचे दर कमी करण्यात आले असू दैनंदिन पासचे दर कमी करण्याबाबत अजुन घोषणा करण्यात आलेली नाही

*औरंगाबादला जाताना वढू-तुळपूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेणार राज ठाकरे : साडेसात वाजण्याच्या सुमारास १०० ते १५० ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन पुण्यामधून औरंगाबादच्या दिशेने निघाणार राज ठाकरे

*पुण्यातून औरंगाबादला निघण्याआधी राज ठाकरे घेणार १०० ते १५० ब्राह्मणांचा आशीर्वाद ; ‘राजमहाल’मध्ये होणार भेट राज ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्याला रवाना होण्यासंदर्भात मनसे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी माहिती दिली.

*पंजाबमध्ये शिवसेनेच्या खलिस्तानविरोधी मोर्चात राडा ; तुफान दगडफेक,भररस्त्यात तलवारीही उपसल्या : या प्रकरणाची दखल थेट पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही घेतली असून यासंदर्भात त्यांनी ट्विटरवरुन माहिती दिलीय

*मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर देवले पुलाजवळ भीषण अपघातात एकाचा मृत्यू : मध्यरात्री एकच्या सुमारास भरधाव वेगाने जात असलेला ट्रक समोरुन येणाऱ्या ट्रकवर आदळला. 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या