💥सामाजिक कार्यकर्ते तथा युवा पञकार फुलचंद भगत यांना राज्यस्तरीय 'अभिमान पुरस्कार' जाहीर....!


💥१ मे रोजी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान💥

मंगरुळपीर:-मंगरुळपीर येथील पंचक्रोशीत असलेले सामाजिक कार्यकर्ते तथा युवा पञकार फुलचंद भगत यांना यंदाचा राज्यस्तरीय 'अभिमान पुरस्कार जाहीर झाला आहे.त्यांनी पञकारीता क्षेञात महाराष्टाची आघाडीची वृत्तवाहिनी एन टीव्ही न्युज मराठी च्या माध्यमातुन सामाजीक, शैक्षणिक,राजकिय,क्रिडा अशा विविध क्षेञात जनजागृतीपर आणी ऊल्लेखनिय कार्याचा म्हणून दि.१ मे २०२२ रोजी वर्धापनदिनी मान्यवरांच्या हस्ते यंदाचा राज्यस्तरिय 'अभिमान पुरस्कार'देण्यात येणार आहे.

          सदैव सामाजिक कार्याची कास धरुन तळागाळातील लोकांसाठी समाजपयोगी कार्य करणारे तसेच पञकारीतेच्या माध्यमातुन विविध क्षेञात ऊल्लेखनिय कार्य करुन जनमानसात ठसा ऊमटवणारे युवा पञकार फुलचंद भगत यांना विविध स्तरातुन याआधीही गौरवण्यात आले असुन त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.फुलचंद भगत यांनी निराधार बालकांना मदत मिळवुन देण्यासाठी पुढाकार घेवुन जिल्ह्यातील निराधारांच्या समस्या शासनदरबारी मांडुन अनेकांना न्याय मिळवुन दिला आहे.कोरोनाकाळात विविध सामाजीक ऊपक्रमाच्या माध्यमातुन लोकहिताचे काम करुन गोरगरीबांना मदत केली.अल्पकाळात पञकारीता क्षेञामध्ये आपले नावलौकीक करत अनेक समस्यांना वाचा फोडली आणी शासनदरबारी न्याय मिळवुन दिली.सामाजीक,राजकीय,क्रीया,शैक्षणिक अशा विविध क्षेञात स्वतः पुढाकार घेवुन तसेच बातमीदारीतुनही आपली चुणुक दाखवुन ऊल्लेखनिय कार्य केले.सतत गरीबांच्या प्रश्नासाठी काम करणार्‍या आणी पञकारीतेतुन समाजहितासाठी झटणार्‍या युवा पञकार फुलचंद भगत यांना यंदाही एन टीव्ही वृत्तवाहीनीकडुन पुरस्काराने गौरविन्यात येणार आहे.दि.१ मे २०२२ रोजी एन टीव्हिच्या २० व्या वर्धापनदिनाचा मुख्य कार्यालयात अभुतपुर्ण सोहळा आयोजीत करण्यात आला आहे.या सोहळ्यामध्ये एनटीव्हीचे मुख्य संपादक तथा मान्यवरांच्या प्रमुख ऊपस्थीतीत यंदाचा राज्यस्तरीय 'अभिमान पुरस्कार'देवुन भगत यांना गौरविन्यात येणार आहे.फुलचंद भगत यांचे पञकारीता आणी सामाजीक क्षेञातील ऊल्लेखनिय कार्य बघता प्रशासकीय तसेच सर्व स्तरातुन नेहमी कौतुक होत असते.यंदाचा त्यांना जाहीर झालेला 'अभिमान पुरस्कार' मिळणार असल्याची बातमी कळताच त्यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत असुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.अभिमान पुरस्कार मिळत असल्याने समाजातील तळागाळातील शोषीत आणी गरजु लोकांसाठी काम करण्यासाठी मला नवी प्रेरणा आणी ऊत्साह मिळाला.युवा वर्गांनी आपल्या शक्ती आणी बुध्दीचा वापर समाजहितासाठी व विधायक कार्यासाठी वापर करावा जेणेकरुन आपण इतरांची प्रेरणा बनू असे आवाहनही याप्रसंगी फुलचंद भगत यांनी केले आहे.चांगल्या कामाची सुरुवात स्वतःपासुन करा म्हणजे इतर लोक प्रेरणा घेवून या समाजपयोगी ऊपक्रमात सहभागी होतील असे मत व्यक्त केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या