💥डॉ.आशुतोष गुप्ता यांच्या नेतृत्वात बोगस डॉक्टरांच्या विरोधात तालुका आरोग्य अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन....!


💥बोगस डॉक्टरांच्या विरोधात चिखली मेडिकल असोसिएशन आक्रमक💥 

✍️मोहन चौकेकर

चिखली (दि.२९ एप्रिल) - चिखली तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून महाराष्ट्रं कॉन्सील ऑफ इंडियन मेडिसिनचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता यानी दि 06/07/ 2018 रोजी लेखी तक्रार देऊनही तालुका आरोग्यं अधिकारी यांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे चिखली मेडिकल असोसिएशन व्दारा  दि 27 एप्रिल रोजी  आक्रमक पवित्रा घेत डॉ. आशुतोष गुप्तां यांच्या नेतृत्वात तालुका वैदयकिय अधिकाऱ्याच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

मागील अनेक वर्षांपासून चिखली शहरासह तालुक्यामध्ये  बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. यासंदर्भात अनेकवेळा निवेदन व पुरावे देऊनही कोणतीच कारवाई होत नसल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग डॉक्टरांना पत्करावा लागला.

यावेळी डॉ. आशुतोष गुप्ता यांनी तालुका वैद्यकिय अधिकाऱ्यांना सज्जड दम दिला.  पुरावे देऊन सुद्धा या बोगस डॉक्टरांवर अधिकारी  कार्यवाही करणार नसतील व आज सायंकाळपर्यंत गुन्हे नोंदविले गेले नाही तर तर  नाईलाजाने तिव्रं आंदोलन उभारण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी अधिकाऱ्यांची राहील असा इशारा यावेळी गुप्ता यांनी दिला.

यासंदर्भात दि २१/04/22 रोजी आरोग्यं तथा कुटुंब कल्याण राज्यमंत्री  भारती पवार यांनादेखील संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. या निवेदनात नमुद करण्यात आले होते की , चिखली तालुक्यात प्रत्येक गावात कुठलेही वैद्यकिय शिक्षण नसलेल्या बऱ्याच बोगस डॉक्टर्सने फिरते दवाखाने आणि स्थायी दवाखाने टाकले आहेत. यांसदर्भात जिल्हाधिकारी , तहसिलदास , जिल्हा शलय चिकीत्सक ,यांना बरेचवेळापत्रव्यवहार करुनही तसेच वृत्तपत्रात बातम्या येऊनही अधिकाऱ्यांना चिरीमीरी देऊन आपले दुकान चालवित असल्याचा आरोप केला आहे. 

चिखली तालुका हा बोगस डॉक्टरांचे माहेरघर झाले असल्याचे नमुद करुन या बोगस डॉक्टरांवर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात केली आहे. तर अशा ६० बोगर डॉक्टरांची यादी असोसिएशनव्दारा पत्रकारांनादेखील देण्यात आली आहे. यामध्ये अनेक राजकिय पक्षाच्या नेत्यांचा सुध्दा समावेश आहे हे विशेष !!

डॉक्टरांच्या या आंदोलनानंतरतरी प्रशासन आपल्या कुंभकर्णी झोपेतुन जागे होते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आरोग्य यंत्रणेच्या कृपाशीर्वादाने व संगनमताने बोगस डॉक्टर सामान्य जनतेच्या जीवाशी खेळ खेळत आहेत. हायर अँटिबायोटिक्स, स्टेरॉइड्स यांचा मारा या सामान्य रुग्णांवर बोगस डॉक्टरांकडून केला जात असल्याने परिसरातील किडनी विकारांना बळी पडणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. हे बोगस डॉक्टर्स अधिकृत डॉक्टरांना धमक्या देतात, अरेरावी करतात आणि दुसरीकडे आरोग्य यंत्रणा अशा बोगस डॉक्टरांना पाठीशी घालते हे दुर्दैवी आहे. तक्रार केली असता तपासणी करायला जाण्यापूर्वी आरोग्य यंत्रणे मधील काही लोक अशा बोगस डॉक्टरांना सावध करून दवाखाना बंद करुन जाण्यास सांगतात व पंधरा दिवसांनी दवाखाना सुरु कर असे सल्ले देतात. अशा बोगस डॉक्टरांशी यंत्रणेशी अर्थपूर्ण जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित झाले आहेत. आरोग्य यंत्रणेने तर एकलारा येथील  एका बोगस डॉक्टरला बी.ए.एम.एस. पदवी प्रदान करण्याचे महान कार्य करून दाखविले आहे. या सर्व बोगस डॉक्टरांवर पंधरा दिवसात आरोग्य यंत्रणेने पायबंद न घातल्यास तालुक्यातील व जिल्ह्यातील डॉक्टरांच्या माध्यमातून उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील डॉ. आशुतोष गुप्ता यांनी दिला.

तालुका आरोग्य अधिकाऱ्याची भुमिका संशयास्पदं :-

 चक्क खाजगी वैदयकिय व्यवसायीकांची माहिती असलेल्या तालुका आरोग्य अधिकारी यांच्या यादीत एका बोगस डॉक्टरपुढे बि ए  एम एस ची पदवी लावण्यात आली आहे. संघटनेव्दारा वारंवार निवेदने देऊनही तालुका आरोग्यं अधिकारी या बोगस डॉक्टरांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप संघटनेव्दारा करण्यात आला. अधिकारी चिरीमीरीघेऊन आपले हितसंबध जोपासत आहेत व त्यांचे पालनपोषण करीत आहेत असेही उपस्थित डॉक्टरांनी वृत्तपत्राच्या प्रतिनीधींना सांगितले. २०१८ पासून तक्रार दाखल करुनही अदयाप एकाही बोगस डॉक्टरवर कारवाई न झाल्यामुळे हे सबंब अधोरेखीत होत आहेत. विशेष म्हणजे असोसिएशनव्दारा ६० बोगस डॉक्टरांची यादी देऊनही त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही...

✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या