💥आनंदी फाऊंडेशनतर्फे मोफत टॅली- जीएसटी, सी ट्रिपल प्लस कोर्स...!


 💥करियरच्या उत्तम संधी देण्याच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करण्याच्या उद्देश💥

 ✍️ मोहन चौकेकर

औरंगाबाद : आनंद एम्पॉवर फाऊंडेशन ही महिला सक्षमीकरणासाठी समर्पित असलेली स्वयंसेवी संस्था आहे. महिला व मुलींसाठी संस्थेने आतापर्यंत अनेक उपक्रम केलेले आहेत. त्याचेच पुढचे पाऊल म्हणजे महिला व मुलींसाठी मोफत टॅली- जीएसटी व सी ट्रिपल प्लस कोर्सचे आयोजन संस्थेने केले आहे. 

करियरच्या उत्तम संधी देण्याच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने आनंदी फाउंडेशन मार्फत विविध कोर्सेस घेतले जाणार आहेत. त्यामध्ये त्यामध्ये टॅली - जीएसटी व सी ट्रिपल प्लस कोर्सचा समावेश आहे. या कोर्सेसमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील.  

या दोन्ही कोर्सेसची तपशीलवार माहिती पुढीलप्रमाणे :

• प्रारंभ : दि. २३ एप्रिल २०२२ पासून 

• वेळ : 

टॅली - जीएसटी : सायं ५ ते ६.३० 

सी ट्रिपल प्लस : सायं ६.३० ते ७.३० 

• स्थळ : पहिला मजला, न्यूट्रीफिट क्लिनिक शेजारी, उल्कानगरी, मे फेअर टॉवर समोर, संभाजीनगर

कोर्सची वैशिष्ट्ये :

१. पूर्णपणे मोफत. फक्त परीक्षा शुल्क भरावे लागेल. प्रवेश क्षमता कमाल वीस

२. फक्त महिला व मुलींसाठी. वय किमान १८ वर्षे, शिक्षण किमान १० वी पास 

३. ऑफलाइन व ऑनलाइन या मिश्र पद्धतीचा अवलंब. 

४. कालावधी : टॅली व जीएसटीसाठी एक महिना, तर सी ट्रिपल प्लस कोर्ससाठी सुमारे दोन महिने.

५. कोर्स यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र 

• माहिती व नोंदणीसाठी संपर्क : ८९७५८५७१५५ 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या