💥पुर्णा-चुडावा मार्गावर गौर फाट्यालगतच्या कॅनॉल जवळ सुसाट वेगाने धावणाऱ्या आयशरने दोन मोटारसायकलस्वारांना उडवले...!


💥या दुदैवी घटनेत एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी ; घटने नंतर आयशर चालक वाहनासह फरार💥

पुर्णा (दि.२३ एप्रिल) - पुर्णा-चुडावा-नांदेड राज्य मार्गावर आज शनिवार दि.२३ एप्रिल २०२२ रोजी दुपारी ०३-०० ते ०३-१५ वाजेच्या सुमारास नांदेडच्या दिशेने बेजवाबदारपणे भरघाव वेगाने आयशर चालवणाऱ्या चालकाने गौर गावा जवळील फाट्यालगतच्या कॅनॉल जवळ पुर्णेच्या दिशेने मोटासायकल घेऊन येणाऱ्या दोन मोटारसायकलस्वारांना उडवल्याची दुर्दैवी घटना घडली असून या घटनेत एकाचा जागीच मृत्यू तर एक जन गंभीर जखमी झाला असून यातील जखमी तरुणाला पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्नालयात भरती करण्यात आले असल्याचे समजते.


या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव विकास दिनाजी सोनकांबळे राहणार आंबेडकर नगर पुर्णा असे असून सदरील तरूण मंदिरांची बांधकाम व मुर्ती शिल्पकारीतेची काम करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता मयत विकास सोनकांबळेने गंगाखेड तालुक्यातील आनंदवाडी येथील मंदिराच्या कामाचे गुत्त घेतले होते या कामाकरीता कामगारांची आवश्यकता असल्यामुळे विकास सोनकांबळे व त्याचा सहकारी अनिकेत देवराव बोंबले राहणार बोधडी ता.किनवट हे दोघे मंदिराचे काम देणाऱ्याची मोटारसायकल घेऊन गंगाखेड येथून पुर्णा मार्गे बोधडीकडे निघाले असता गौर येथून पुन्हा पुर्णा येथील आपल्या घराकडे जाणाच्या उद्देशाने विकास सोनकांबळे हा आपली मोटार सायकल वळवत असतांना भरघाव वेगाने नांदेडच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात आयशर चालकाने त्यांना उडवल्यामुळे विकास सोनकांबळे याचा जागीच मृत्यू झाला तर सोबतच सहकारी अनिकेत बोंबले हा गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला विष्णूपुरी नांदेड येथील शासकीय रुग्नालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या