💥ज्यांना कोणाला भोंगे लावायचे तर खुशाल लावू द्या.....!

 


💥परंतु विचारशील तरुणांनों...तुम्ही शिक्षणावरुन लक्ष विचलीत होवू देवू नका💥

✍🏻लेखक/पत्रकार - किरण घुंबरे पाटील

ज्यांना कोणाला हनुमान चालीसा वाचायची तर खुशाल वाचू द्या ज्या कोणाला दंगली  करायच्या असतील तर खुशाल करू द्या !

  परंतु विचारशील तरुणांनो ! तुम्ही शिक्षणावरुन लक्ष विचलीत होवू देवू नका ! शिक्षण हाच तुमच्या उद्धाराचा मार्ग आहे !! तुम्ही चांगले शिकून सवरून स्वत:चे आयुष्य घडविले तर आई वडिल, नातेवाईक व समाज यांना मदतीचा हात देवू शकता ! तुम्ही सनदी सेवा , पोलिस सेवा , महसूल सेवा , अथवा खाजगी उद्योगात इंजीनीयर , मॅनेजर , तंत्रज्ञ म्हणून लागलात तर तेथील ‘सिस्टिम’ समजून येते व आपण काय करु शकतो याचा अंदाज देखील येतो ! तुम्ही वकील , डॅाक्टर , सी ए झालात तर न्यायव्यवस्था , आरोग्य व्यवस्था , आर्थिक व्यवस्था यांचा आपोआप अभ्यास होईल ! शिक्षक, प्राध्यापक झाला तर विज्ञानवादी नवसमाज घडवाल, 

तुम्हाला भारत देशाचे आदर्श नागरिक म्हणून नावा रुपास यायचे आहे ! 

हे चालीसा वाचणे ,भोंगे लावणे, जातीय दंगली करणे त्यांनाच करू देत !!

ज्यांनी आम्हाला हजारों वर्षे 

शिक्षणापासून मुद्दाम वंचित ठेवले होते आज तेच आम्हाला विध्वसंनाच्या मार्गावर नेत आहेत !!

म्हणून तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आलेली आहे , ती म्हणजे चांगले शिकून सवरून भारतीय संविधानाचे रक्षण करायचे व संसदीय लोकशाही टिकवायची ! 

विचारशील तरुणांनो ! या देशाचे भवितव्य तुमच्या हातात आहे !!

यासाठीच तुम्ही उच्च शिक्षण घेवून महापुरुषांच्या  स्वप्नातील भारत देश निर्माण करा !!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या