💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पूर्णा तालुक्यातील १७ गावातील ६१ दिव्यांगांना पिवळ्या अंतोदय रेशनकार्डचे मोफत वाटप....!


💥जिल्हा प्रमुख शिवलींग बोधने यांच्या हस्ते करण्यात आले रेशनकार्डचे वितरण💥

परभणी - प्रहार जनशक्ती पक्ष पूर्णा शाखेच्या वतीने तालुक्या शासकीय योजनांपासून वंचित असणाऱ्या दिव्यांग बांधवांची शोध मोहिम घेण्यात आली होती यात अंतोदय योजनेतील पिवळ्या रेशनकार्ड, पगार न मिळाले व घरकुल योजनेपासून वंचित असणाऱ्या दिव्यांगांची कागदपत्रे गावोगावी जाऊन जमा करण्यात आली व संपुर्ण माहिती कागदपत्रांसह तहसिल कार्यालय पुर्णा येथे जमा करण्यात आली होती व या दिव्यांगांना तत्काळ अंतोदय योजने अंतर्गत पिवळे रेशन कार्ड व पगारी सुरू करण्या बाबत पाठपुरावा करण्यात आला होता.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या या अनोख्या सामाजिक मोहिमे अंतर्गत काल दि .१८ एप्रिल २०२२ रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तहसिल कार्यालय पुर्णा समोरील पटांगणात दिव्यांगांचा मेळावा घेऊन पूर्णा तालुक्यातील १७ गावातील दिव्यांगांना अंतोदय योजनेतील ६१ पिवळे रेशनकार्डचे निःशुल्क वाटप प्रहार जनशक्तीच्या वतीने परभणी जिल्हा प्रमुख शिवलींग बोधने व युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचेला अभिवादन करून करण्यात आले.

पुर्णा तालुक्यात प्रथमच अशा प्रकारचा दिव्यांगांचा मेळावा घेऊन त्यांना मोफत रेशन कार्ड वाटण्यात आले आहे. या प्रसंगी उपस्थितांना जिल्हा प्रमुख शिवलींग बोधने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले की आज पर्यंत पूर्णा तालुक्यातील दिव्यांग, निराधार व विधवा माता भगिनींना आपल्या हक्कासाठी संघर्ष करावा लागत असून यांच्या साठी राज्य व केंद्र सरकारच्या योजना या गरजवंता पर्यंत पोहचत नाहीत त्या योजना फक्त शासकीय कार्यालयातील फायली मध्येच दाबून राहतात परंतु या पुढे असे अजिबात होणार नसून समाजातील सर्वात दुर्लक्षित व वंचित असलेल्या या घटकांना न्याय देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष ताकतीने काम करणार असून शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहचविण्याचे काम प्रहार जनशक्ती पक्ष मा.ना. बच्चूभाऊ कडू यांच्या सामाजिक बांधिलकीतून करणार आहे.

मेळाव्याला मोठ्या प्रमाणावर दिव्यांग बंधू भगिनींनी हजेरी लावली होती. मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रहार जनशक्तीचे पुर्णा तालुका प्रमुख शिवहार सोनटक्के, युवा आघाडी तालुका प्रमुख नरेश जोगदंड, शहर प्रमुख संजय वाघमारे, मंचक कुऱ्हे, गजानन परडे, सुरेश वाघमारे, मोतीराम भोसले, व्यंकटी डाखोरे, चंपत कदम, बाबुराव सोलव, नरेंद्र डाखोरे, हाउसाजी तरासे, श्रीहरी इंगोले, सिद्धेश्वर आगलावे, मुंजाजी लोखंडे, विठ्ठल बुचाले, विठ्ठल सौराते, रामदासे वाघमारे, आप्पाराव तांबे, शिवसांब पोटे, जगन्नाथ नवघरे, शेख फिरोज इत्यांदीनी पुढाकार घेतला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या