💥पुर्णा शहरातील हरिनगर परिसरातील नवीन वसाहतीत विद्युत रोहित्रासह थ्रीफेस लाईन बसवण्याची मागणी...!



💥विद्युत महावितरण विभागाच्या अभियंत्यांकडे एका निवेदनाद्वारे नगरसेवक विरेश कसबे यांनी केली मागणी💥

पुर्णा (दि.२० एप्रिल) - शहरातील रेल्वे लोहमार्गा पलिकडील हरिनगर परिसरातील नवीन वसाहतीत अनेक लोकांनी नवीन घरांची बांधकाम केल्यामुळे या परिसरातील वाढती जनसंख्या लक्षात घेता महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण विभागाने या परिसरात विद्युत रोहित्रासह थ्रीफेस लाईन तात्काळ बसवावी अशी मागणी या परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक विरेश कसबे यांनी आज बुधवार दि.२० एप्रिल २०२२ रोजी विद्युत महावितरण विभागाच्या अभियंत्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.



महाराष्ट्र राज्य विद्युत महाविरण विभागाच्या अभियंत्यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की हरिनगर परिसरातील नवीन वसाहतीत बांधलेली घरे ही कावशी नाल्यालगत बांधण्यात आलेली असून येथील लोकांना टु फेस लाईन देण्यात आल्यामुळे विद्युत पुरवठा अत्यंत कमी मिळत असल्यामुळे या परिसरातील लोकांना फार त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे विद्युत महावितरण विभागाने या परिसराला नवीन विद्युत रोहित्र बसवून थ्रीफेस लाईन लाईन देण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाचा अवलंब करून आपल्या कार्यालया समोर आमरण उपोषण करण्यात येईल असे ही निवेदनात नमूद करण्यात आले असून या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक विरेश कसबे यांची स्वाक्षरी आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या