💥तोष्णीवाल यांच्या घरावर हल्ला करणार्‍या आरोपीवर कारवाई करा...!


💥विविध संघटनेच्या वतीने निषेध; पोलिस अधिक्षक कार्यालयाकडे निवेदन💥

हिंगोली /- जिल्हा व्यापारी संघाचे जिल्हाध्यक्ष तथा हिंगोली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष  नंदकिशोर तोष्णीवाल यांच्या घरावर  झालेल्या भ्याड हल्ल्‌याचा हिंगोलीत निषेध व्यक्त करीत माहेश्वरी सभा, सकल राज्यस्थानी संघ व जिल्हाभरातील  पत्रकारांच्या वतीने सोमवार दि.२५ एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांना निवेदन देत आरोपींना तात्काळ अटक करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.


जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्याकडे दिलेल्या निवेदनात नमूद केले की, जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांच्या घरावर सोमवारी पहाटेच्या सुमारास गुंड प्रवृत्तीच्या १३ ते १४ लोकांनी शस्त्रास्त्र घेऊन जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी नंदकिशोर तोष्णीवाल यांनी यापूर्वी कळमनुरी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार ही केली होती. मात्र पोलिसांनी गांभीर्याने न घेतल्याने हा जीवघेणा हल्ला त्यांच्यावर झाला. हल्ला प्रकरणी हिंगोली येथे व्यापारी संघटना,  माहेश्वरी सभा, राजस्थानी संघ व जिल्हाभरातील पत्रकाराच्या वतीने या घटनेचा  तीव्र निषेध करीत तात्काळ हल्लेखोरांना अटक करून कारवाई करण्याची मागणी विविध संघटनेच्या वतीने पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर दिलीप चव्हाण, मनोज आखरे, गजेंद्र बियाणी, अनिल नेनवानी, पंकज अग्रवाल, संजय देवडा, सुमित चौधरी, दीपक जैन, संजय जयस्वाल, रविंद्र सोनी, प्रमोद मुंदडा, जगजीत खुराणा, गोपाल दुबे, पत्रकार वसंत कुमार भट्ट, प्रद्युम्न गिरीकर, तुकाराम झाडे, कन्हेया खंडेलवाल, प्रकाश इंगोले, सुनील पाठक, चंदू वैद्य, विजय गुंडेकर आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.....

- भरारी वृत्त सेवा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या