💥विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याची सेलू तालुका रुग्णसेवा संघर्ष समितीची मागणी...!


💥महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली मागणी💥 

सेलू प्रतिनिधी -

पवित्र रमजान महिना व माध्यमिक व प्राथमिक शाळांत परीक्षेच्या द्वितीय सत्राच्या परीक्षा चालू असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होणार आहे सध्याचे करण्यात येणारे भारनियमन कडक  उन्हामुळे खूप त्रासदायक असल्याकारणाने सर्व जनतेचे हित पाहता सेलू तालुका रुग्णसेवा संघर्ष समितीने निवेदनाद्वारे महावितरण पुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी केली आहे.

13 एप्रिल रोजी कार्यकारी अभियंता महावितरण उपविभाग सेलू यांच्याकडे दिलेल्या निवेदनात सेलू तालुका रुग्ण सेवा संघर्ष समितीने भारनियमन रद्द करून विद्युत पुरवठा सुरळीत ठेवावा अशी मागणी केली आहे रमजानचा व प्रार्थमिक व माध्यमिक शाळांची द्वितीय सत्र परीक्षा यामुळे कडक उन्हामुळे होणारा त्रास पाहता परीक्षा संपेपर्यंत तरी 24 तास वीजपुरवठा सुरळीत ठेवावा अशी मागणी केली आहे या निवेदनावर तालुका रुग्नसेवा संघर्ष समितीचे  शेख रहीम, शेख रफीक, दीपक चव्हाण ,लालू खान, अजित बेलदार,गौस भाई यांच्या स्वाक्षरी आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या