💥वसमत तालुक्यातील हट्टा पत्रकार संघातर्फे हट्टा पोलिस स्थानकाचे नुतन सपोनि.गजेंद्र सरोदे यांचा सत्कार....!


💥यावेळी हट्टा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण चव्हाण यांच्या अनेक पत्रकारांची उपस्थिती💥 

वसमत (दि.२७ एप्रिल) - तालुक्यातील हट्टा पोलीस ठाण्याचे नवीन ठाणेदार पदी गजेंद्र सरोदे यांची नियुक्ती केल्याने त्यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला.

दरम्यान हिंगोली येथील दहशतवादी विरोधी सेल मध्ये कार्यरत असलेले गजेंद्र सरोदे यांची हट्टा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पदी नियुक्ती आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी काढले आहेत.त्यानुसार आपल्या पदाचा पदभार घेतला असता त्यांचा सत्कार 27 एप्रिल बुधवार रोजी हट्टा ग्रामीण पत्रकार संघातर्फे करण्यात आला.

यावेळी हट्टा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण चव्हाण, शेख सादिक, संतोष शिंदे, बाळासाहेब दाळ पुसे, सुरेश पवार, शेख मोहसीन ,मनोज परीहार, सह इमरान कादरी, गणेश लेकुळे होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या