💥पुर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथील रमेश ज्ञानोबा ढवळे यांचे दिर्घ आजाराने वयाच्या २६ व्या वर्षी दुःखद निधन...!


💥त्यांच्या तरुण वयात जाण्याने धानोरा काळे सह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे💥

पुर्णा (दि.०६ एप्रिल) - तालुक्यातील धानोरा काळे येथील रमेश ज्ञानोबा ढवळे वय २६ वर्ष यांचे आज बुधवार दि.०६ एप्रिल रोजी सकाळी ०९-०० वाजेच्या सुमारास परभणी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना दिर्घ आजाराने दुःखद निधन झाले.

शांत संयमी,सर्वांशी मनमिळावू जिद्दी स्वभाव,सामाजिक कार्यात अग्रेसर असलेला नेहमी धडपड असलेला रमेश ढवळे यांच्या तरुण वयात जाण्याने धानोरा काळे सह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुर्णेतील मुद्रांक विक्रेते ज्ञानोबा बळीराम ढवळे यांचे ते लहाने चिरंजीव होते. त्यांच्या पश्चात पत्नी,एक तीन वर्षाचा मुलगा, वडील ,आई,भाऊ गजानन,एक बहिण, आजी,आजोबा,दोन काका,काकी,चुलत भाऊ,बहिणी असा एकत्र मोठा परिवार आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या