💥बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या वतीने दिला जाणारा यंदाचा विधी महर्षी पुरस्कार जाहिर...!


💥बीडचे प्रसिद्ध विधिज्ञ एडवोकेट श्री कालिदास नाना थिगळे यांना पुरस्कार जाहीर💥   

✍️ मोहन चौकेकर

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या वतीने दिला जाणारा विधी महर्षी हा पुरस्कार विधी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तसेच सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या वकिलांना दिला जातो.

सन 1968 पासून वकीली क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तसेच विविध शैक्षणिक संस्था सामाजिक कार्य  बीड येथील एडवोकेट श्री कालीदास नाना थिगळे   यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.दिनांक 14 एप्रिल 20 22 रोजी ठाणे येथे पार पडणाऱ्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या राज्य परिषदेमध्ये सदर पुरस्कार देण्यात येणार आहे. सदर पुरस्काराचे स्वरूप मानपत्र व सत्कार असून सदर कार्यक्रमास बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ऍण्ड गोवाचे चेअरमन श्री वसंतराव साळुंखे व माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती श्री अभय ओक, माननीय मुख्यमंत्री व इतर सन्माननीय अतिथी उपस्थित राहणार आहेत.

 विधी, सामाजिक व शैक्षणिक कार्यात आपल्या कर्तुत्वाने वेगळा ठसा उमटवणारे व सदैव सामाजिक कामात अग्रेसर असणारे, निस्पृह पणे काम करणारे श्री एडवोकेट कालीदास थिगळे नाना यांना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या