💥पुर्णा येथील बुद्ध विहारात दि.२४ एप्रिल रोजी स्पर्धा परीक्षा व व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.....!


💥भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षा व व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन💥

पूर्णा (दि.२२ एप्रिल) -  भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान बुद्ध सार्वजनिक जयंती मंडळ पूर्णा यांच्या वतीने भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षा व व्यवसाय मार्गदर्शन शिबिर रविवार दि.२४ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११-०० वाजेच्या सुमारास येथील बुद्ध विहार या ठिकाणी आयोजित केले आहे.


व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे अध्यक्ष म्हणून गुरू बुद्धी स्वामी महाविद्यालया चे प्राचार्य डॉ के राजकुमार हे असून प्रमुख मार्गदर्शक  उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील गंगाखेड पूर्णा तहसीलच्या तहसीलदार पल्लवी टेमकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय नरळे स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक गोपाळ काटोले असणार आहेत.

स्पर्धा परीक्षा व्यवसाय मार्गदर्शन शिबिराला उपस्थित राहण्याचे आवाहन जयंती मंडळाचे अध्यक्ष गणेश सोनुले गौतम वाघमारे सचिव विजय  खंडागळे रौफ कुरेशी साहेबराव सोनवणे आदींनी केलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या