💥सामाजिक क्रांती मधूनच राजकीय क्रांती जन्म घेत असते.....!


💥प्रा.डॉ. ह.नी.सोनकांबळे यांचे प्रतिपादन💥

पूर्णा (दि.20 एप्रिल) - भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान बुद्ध सार्वजनिक जयंती मंडळ पूर्णा यांच्या वतीने जाहीर व्याख्यानाचे आयोजन बुद्ध विहार पूर्णा याठिकाणी भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो भदंत पैया वंश भदंत संघरत्न यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी साडेअकरा वाजता बुद्ध विहारा च्या सभागृहांमध्ये आयोजित केले होते.


प्रमुख व्याख्याते व सत्कार मूर्ती सुप्रसिद्ध विचारवंत लेखक समीक्षक प्रा डॉ. ह.नी. सोनकांबळे हे होते विचार मंचावर माजी उपनगराध्यक्ष नगरपालिकेचे गटनेते उत्तम भैय्या खंदारे नगरसेवक एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड सामाजिक कार्यकर्ते दादाराव पंडित प्राध्यापक अशोक कांबळे जयंती मंडळाचे अध्यक्ष गणेश सोनुले सचिव विजय खंडागळे  , राहुल धबाले आदींची उपस्थिती होती.

आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानामध्ये आंतरराष्ट्रीय संदर्भ देत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार काळाच्याही पुढे होते . रशिया ,चीन या देशाच्या बाबत 1940 च्या दशकामध्ये त्यांनी जी भविष्यवाणी केली होती ती खरी ठरताना दिसत आहे असे ते म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च नैतिक मूल्य अंगिकारून समता स्वातंत्र्य विश्वबंधुत्व या महान मूल्याचा प्रचार प्रसार केला. भारतीय राज्यघटनेमध्ये त्यांच्या विचारांचं प्रतिबिंब आपणास पहावयास मिळते.

उच्च प्रकारची नीतिमत्ता समाजातील शोषित पीडित वंचित उपेक्षित समाजाविषयी असलेली बांधिलकी त्यांच्या समाज कारणांमध्ये आपणाला दिसते. अशा प्रकारच्या समाज कारणांमधून त्यांनी राजकारण केले संपूर्ण जगाला आदर्शवत त्यांचे विचार व कार्य आहेत माजी उपनगराध्यक्ष उत्तम भैय्या खंदारे यांनी आपल्या मनोगतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यांचे मानव मुक्ती चे विचार अंगीकारून साजरी केली पाहिजे असे आव्हान त्यांनी उपस्थितांना केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध विचारवंत प्रकाश कांबळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उच्च विचार उच्च दर्जाची राहनी प्रखर स्वाभिमान राष्ट्रभक्ती उच्च प्रकारची नीतिमत्ता अंगीकारून खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायित्व स्वीकारावं त्या दिशेने वाटचाल करावी असे प्रतिपादन त्यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन नरवडे यांनी तर सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत शेवाळे यांनी केले.

यावेळी इंजिनीयर पीजी रणवीर सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड विजय जोंधळे शिवाजी वेडे भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सचिव अतुल गवळी किशोर ढक रगे बौद्धाचार्य उमेश बऱ्हाटे टी झेड कांबळे गंगाधर कांबळे बरबडी कर पत्रकार मोहन लोखंडे प्रदीप नन्नवरे मुकुंद पाटील आदींची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरज जोंधळे प्रकाश जगताप सुनील खाडे आदींनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या