💥परभणी शहरातील सुभाष रोड गौरक्षण परिसरातील कर्णबधिर मुलगा झाला आधिकारी....!


💥तापडिया कुटुंबातील शुभम या कर्णबधिर मूलांने प्रचंड जीद्द,चिकाटी, मेहनतीच्या बळावर मिळवले स्पर्धा परीक्षात यश💥 

परभणी (दि.१७ एप्रिल) :- शहरातील सुभाष रोड वरील गौरक्षण परिसरातील तापडिया कुटुंबातील कर्णबधिर मुलगा चि.शुभम संजय तापडिया या मूलांने प्रचंड जिद्द,चिकाटी अन् मेहनतीच्या बळावर स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यश मिळवून जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंतापदी नोकरी पटाकावण्यात यश मिळवले आहे. 

त्याचे पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण अक्षरज्योती विद्यालयात झाले असून आभियांत्रिकीचे शिक्षण शासकीय आभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद येथे झाले आहे. २०१९ ला लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या अभियांत्रिकीच्या परिक्षेत त्यांच्या आरक्षित गटात त्याने  पहिला  क्रमांक पटाकवला.आता त्याची महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता पदी निवड झाली आहे. 

हा पदासाठी मुख्य परिक्षा २०१९ ला दिली होती. या परिक्षेचा अंतिम निकाल १३ एप्रिल रोजी लागला असून यामध्ये शुभम संजय तापडिया हा पहिला प्रयत्नात उत्तीर्ण झाला आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या यशाचे श्रेय तो आई व बाबाना सौ. संगिता व संजय तापडिया यांना देतो.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या