💥भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे तत्वज्ञान जगामध्ये सर्व श्रेष्ठ आहे .....!


💥सुप्रसिद्ध विचारवंत प्राध्यापक डॉक्टर यशवंत गोसावी यांचे प्रतिपादन💥

पूर्णा (दि.18 एप्रिल) - भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान बुद्ध सार्वजनिक जयंती मंडळ पूर्णा च्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पूर्णा या ठिकाणी सकाळी 11 वाजता जाहीर व्याख्यानाचे आयोजन जयंती मंडळाच्या वतीने करण्यात आले होते भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो भंते बोधी धम्मा भंते पैय्या वंश  भन्ते संघरत्न श्रामनेर पय्यादिप यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व जयंती मंडळाचे साहेबराव सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते प्रमुख व्याख्याते म्हणून पुणे येथील सुप्रसिद्ध विचारवंत संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते प्राध्यापक डॉक्टर यशवंत गोसावी हे होते.

याप्रसंगी विचार मंचावर रिपाईचे जेष्ठ नेते प्रकाश कांबळे नगरपालिकेचे गटनेते उत्तमभय्या खंदारे नगरसेवक एडवोकेट धम्मा जोंधळे जयंती मंडळाचे अध्यक्ष गणेश सोनुले  प्रा.अशोक कांबळे सामाजिक कार्यकर्ते दादाराव पंडित आदींची उपस्थिती होती आपल्या अभ्यासपूर्ण ओघवत्या शैली मध्ये महाराष्ट्र मधील महापुरुषांचा समाजसुधारकांचा समाजसुधारणेचा परिवर्तनाचा  आढावा त्यांनी घेतला.


महामानव भगवान बुद्ध महात्मा कबीर छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे आदींच्या जीवनामधील प्रेरणादायी प्रसंग सांगून उपस्थितांना संबोधित केले. महापुरुषांचे समाजसुधारकांचे विचार आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले पाहिजे त्यांचे विचार आपण जगले पाहिजे. शाहू महाराजांनी गंगाराम कांबळे या अस्पृश्य तरुणांला हॉटेल सुरू करून दिले व ते स्वतः आपल्या लवाजम्यासह त्या हॉटेल मध्ये जाऊ लागले अस्पृश्यता निवारण करण्याचा त्यांचे ते क्रांतिकारी पाऊल होते.

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने शोषित पीडित वंचित बहुजन समाजाला स्त्रियांना दलित पददलित गावकुसाबाहेर राहणाऱ्या समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शाळा काढल्या आपल्या पिण्याच्या पाण्याचा हौद खुला करून दिला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरू मानले होते महात्मा ज्योतिबा फुले यांचे समग्र विचार व कार्य भारतीय राज्य घटनेच्या माध्यमातून त्यांच्या विचारांची व कार्याची अंमलबजावणी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रखर देशभक्त होते मी प्रथमता भारतीय व अंतिम तः भारतीय आहे. धर्मापेक्षा राष्ट्र श्रेष्ठ आहे अशी प्रखर विचार त्यांनी प्रतिपादित केले व त्याची अंमलबजावणीही केली.

ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार राष्ट्र उभारणीसाठी त्यांनी दिलेले योगदान खूप मोठे आहे असे प्रतिपादन केले. पंचशील नाट्य ग्रुप पूर्णा   चा लेझीम पथकाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीमध्ये अतिशय नयनमनोहर लेझीमच्या तालावर  महापुरुषांच्या जीवन कार्यावर अदाकारी च विलोभनीय दर्शन घडविले. त्या पथकातील  मुलींचा सन्मानपत्र देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे यांनी केले तर सूत्रसंचालन नितीन नरवडे यांनी व आभार किशोर ढाकरगे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बौद्धाचार्य त्रंबक कांबळे अतुल गवळी जयंती मंडळाचे सचिव विजय खंडागळे बौद्धाचार्य उमेश बाऱ्हा टे दिलीप गायकवाड सुरज जोंधळे आदींनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या