💥द.रा कूलकर्णी यांच्या ऋणानुबंध पुस्तकाचे रविवारी प्रकाशन....!

 


💥नूतन महाविद्यालयाच्या रा.बा.गिल्डा सभाग्रहात सकाळी 10 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन💥

सेलू प्रतिनिधी-

सेलू : नूतन विद्यालय शिक्षण संस्था आणि मराठवाडा पेन्शनर्स असोसिएशन यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात नूतन शिक्षण संस्थेचे माजी सचिव तथा मा. प्राचार्य द.रा कुलकर्णी सर यांच्या 'ऋणानुबंध' या पुस्तकाचे प्रकाशन रविवार तारीख 17 रोजी  नूतन महाविद्यालयाच्या रा. बा. गिल्डा सभाग्रहात सकाळी 10 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे

ऋणानुबंध या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी चैतन्य महाराज देगलूरकर, पंढरपूर तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे मराठी विभाग प्रमुख साहित्यीक डॉ. केशव सखाराम देशमुख हे उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन सेलू नूतन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एस. एम. लोया, मराठवाडा पेन्शनर्स असोसिएशन सेलूचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ.विनायक कोठेकर, रजत प्रकाशन औरंगाबाद चे अशोक कुमठेकर, डॉक्टर शरद कुलकर्णी अजित मंडलिक यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या