💥संत जनाबाई महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सामाजिक कार्याची महाराष्ट्र शासनाने घेतली दखल....!


💥कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.प्रकाश रामचंद्र सुर्वेंना महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून राज्यस्तरीय पुरस्कार💥

गंगाखेड (दि.२६ एप्रिल) - संत जनाबाई महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने राबविलेल्या सामाजिक कार्याची महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन सन 2017-18 या वर्षाचा उत्कृष्ट महाविद्यालय रा. से.यो.युनिट(पथक) व उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी म्हणून राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक डॉ.प्रकाश रामचंद्र सुर्वे यांना महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

     दिनांक 25 एप्रिल 2022 रोजी महाराष्ट्र शासनातर्फे एस.एन. डी. टी. महिला विद्यापीठ, चर्च गेट मुंबई येथील पाटकर सभागृह येथे महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री मा.उदयजी सामंत यांच्या हस्ते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एम.धुत यांना उत्कृष्ट महाविद्यालय (रा.से.यो.) पथक व उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी म्हणून महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक डॉ.प्रकाश रामचंद्र सुर्वे यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम यासह राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

     या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई च्या कुलगुरू मा. डॉ.उज्ज्वलाताई चक्रदेव तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव मा.डॉ.विकासचंद्र रस्तोगी,महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ,नागपूर चे कुलगुरू मा.डॉ. ए. एम.पातूरकर,राज्यस्तरीय सल्लागार समिती चे सदस्य मा.अंकित प्रभू,राज्य संपर्क अधिकारी व विशेष कार्य अधिकारी रा.से.यो.मा.डॉ.प्रशांत कुमार वनजे,माजी राज्य संपर्क अधिकारी व विशेष कार्य अधिकारी रा. से.यो. मा.डॉ.अतुलजी साळुंखे,पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रातील विविध विद्यापीठाचे रा.से.यो. संचालक,पुरस्कार प्राप्त विविध महाविद्यालयाचे प्राचार्य,पुरस्कार प्राप्त रा.से.यो.कार्यक्रमाधिकारी व पुरस्कार प्राप्त विविध महाविद्यालयाचे स्वयंसेवक व स्वयंसेविका,एस.एन.डी.टी.विद्यापीठाचे प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते,"कोव्हिड युवा योध्दा" या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

     या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ.आत्मारामजी टेंगसे, उपाध्यक्ष ऍडव्होकेट मा.रमेशराव मोहोळकर,सचिव ऍडव्होकेट मा.संतोषजी मुंढे, सहसचिव मा.दशरथराव चौधरी, कोषाध्यक्ष मा.ऍडव्होकेट सूर्यकांत चौधरी,संस्थेचे सर्व माननीय संचालक,महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक वृंद, कार्यालयीन कर्मचारी,विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक वर्ग यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे अभिनंदन केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या