💥घरी बसून काम करून पैसे मिळवा ; हजारो रुपये कमाईचे अमीश दाखवून फसवणूक...!


💥जिंतूर पोलिसा स्थानकात फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल💥

जिंतूर प्रतिनिधी /  बि.डी.रामपूरकर

जिंतूर घरी बसून काम करून पैसे मिळवा स्किमचे आमिष दाखवुन जिंतूर शहर आणि तालुक्यातील महिलांची फसवणुक करणाऱ्या  आरोपी विरोधात जिंतूर पोलिस ठाण्यात फसवणुकीच गुन्हा बुधवार २७ एप्रिल रोजी दाखल झाला आहे. संबधीताने महिलांची ५६ हजार रुपयांची फसवणुक केली आहे.

कविता संजय सूर्यवंशी यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी ह्या अंगणवाडी सेविका असून जिंतूर तालुक्यातील पांढरगळा येथील रहिवाशी आहेत. २४ सप्टेंबर २०२१ मैत्रिणीने त्यांना फोन करून एका साबुन बनविणाऱ्या कंपनी विषयी माहिती दिली. घर बसल्या सदर कंपनीकडून साहित्य येणार असून साबुन बनवुन दिल्यावर त्याचा मोबदला मिळणार असल्याचे सांगितले. या विषयी माहितीसाठी सुरुवात केली. शंकर कारभारी जाधव (रा. ठाणे) यांची ओळख करून दिली. संबधीत इसमाने फिर्यादीला फोन करून माहिती सांगुन आयडी बनविण्यास कळविले. त्यानुसार महिलेने स्वतःचा आयडी  बनविला. सुरुवातीचे काही दिवस चागले गेले व व्यवस्थीत चालले. त्यानंतर  शंकर जाधव याने वेळेवर पैसे दिले नाही   फिर्यादीने परत महिला कपंनी कडून काम ही दिले नाहीं.

पैसे मागितल्याने शंकर जाधव यान उडवा उडवीची उत्तरे देण्यास फसवणुक झाल्याचे लक्षातआल्यावर संबधीतआरोपी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.कामाचे पैसे आरोपीने जिंतूर तसेच शहर आणि परिसरातील महिलांची ५६ हजार रुपयांची फसवणुक केली कंपनीशी जोडलेल्या इतर महिलांनाही काम दिले आहे. पुढील  तपास पोलिस कारीत आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या