💥पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील दिव्यांगांची दयनीय अवस्था ; दिव्यांग नागरी सुविधांसह शासकीय योजनांपासून वंचित...!


💥प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सोनटक्केंनी घेतली दिव्यांगांची दखल शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे दिले आश्वासन💥

पुर्णा (दि.२० एप्रिल) - तालुक्यातील ताडकळस येथील अनेक दिव्यांगांची कुटुंब मागील ४५ वर्षापासुन मुलभूत नागरी सुविधांसह विविध शासकीय योजनांपासून वंचित असून या कुटुंबांना साधी शिधापत्रिकेचा (राशन कार्डचा) लाभ देखील मिळत नसल्याची गंभीर बाब नुकतीच समोर आली असून सदरील बाब प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवलींग बोधने व पुर्णा तालुकाध्यक्ष शिवहार सोनटक्के यांना समजताच तालुकाध्यक्ष सोनटक्के यांनी संबंधित दिव्यांग कुटुंबांची भेट घेतली.


यावेळी ताडकळस येथील रहिवाशी असलेल्या दिव्यांग कुटुंबाची भेट घेतली असता त्यांच्या निदर्शनास असे आले की कुटुबातील तिन व्यक्ती अंपग असुन त्यांना आपल्या मुलाबळाचा उदरनिर्वाह करण्यासाठी चक्क त्यांना रेल्वे प्रवासी गाड्यांमध्ये भिख मागण्याची वेळ आली असुन त्याच्या कुटुंबातील महानंदाबाई ह्या पण शारीरिक दृष्ट्या दिव्यांग असुन त्यांच्यावर स्वतःसह कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी  पुणे येथे वॉचमन म्हणून नौकरी करण्याची वेळ आली आहे.आपल्या मुलाबाळांना व पतीला जगवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असल्यामुळे लॉकडाऊनच्या काळात पुण्याहून त्या  ताडकळस येथे आपल्या गावी परत आल्या असुन त्यांना कुठल्याही योजनेचा लाभ मिळालेला नाही गावामधये तिन राशन दुकान असुन त्याना राशन चा लाभ नाही व घरकुलाचा लाभ नाही व शासनाच्या कोणताच लाभ मिळालेला नाही असे त्यांनी यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सोनटक्के यांना सागितले त्या दिव्यांग कुटुंबाची ही दयनीय अवस्था पाहून तालुकाध्यक्ष सोनटक्के यांनी लवकरात लवकर या कुटुंबाला शिधापत्रिकेसह विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात येईल असे वचन दिले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या