💥तब्बल आठ दिवसापासुन बेपत्ता 'जय' अजुनही सापडेना,पोलिस तपास सुरु....!


💥वादातुन निघुन गेल्याचा संशय,तिघांची याप्रकरणी केली पोलिसांनी चौकशी💥

(फुलचंद भगत)

मंगरुळपीर:-गावातील युवकांसोबत वाद झाल्यानंतर घरुन निघुन गेलेला रा.शहापुर हल्ली मुक्काम पिंप्री खुर्द येथील जय विजय सुर्वे हा युवक दि.१७ एप्रीलपासुन बेपत्ता आहे.तब्बल आठ दिवस ऊलटुनही अद्यापपर्यत शोध न लागल्यामुळे वेगवेगळे संशय व्यक्त केल्या जात आहे.मंगरुळपीर पोलीसांनीही याप्रकरणी आता लक्ष देवुन तपासचक्र फिरवत तिघांची चौकशी केल्याचे समजते.

           मंगरूळपीर तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील जय विजय सुर्वे वय-२० वर्ष,चेहर्‍याचा रंग गोरा,केस कुरळे,अंगात गुलाबी टि शर्ट घातलेला व पांढरी पॅन्ट असणार्‍या वर्णनाचा युवक दि.१७ एप्रील रविवारपासुन बेपत्ता आहे.यासंदर्भात युवकाच्या नातेवाईकांनी सदर युवक हरवला असल्याची मंगरुळपीर पोलीस स्टेशनला तक्रारही दाखल केली आहे.तब्बल आठ दिवस ऊलटुनही याप्रकरणी युवकाचा शोध न लागल्यामुळे विविध चर्चेला सुरुवात झाली आहे.मिळालेल्या माहीतीवरुन जय विजय सुर्वेचा गावातीलच काही युवकांशी वाद झाला असल्याचे समजते.पोलिसांनी याप्रकरणी तिघांची चौकशी केल्याचे कळले.पोलिसांनी त्वरीत जय चा शोध घ्यावा अशी मागणी नातेवाईकांकडुन केल्या जात आहे.पोलिसांनी अत्याधुनिक तपास यंञणा ऊपयोगात आणून आणी मोबाईल लोकेशन घेवुन तपास करुन हे प्रकरण ऊजेडात आणावे अशी मागणीही होत आहे.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या