💥जिंतूर तालुक्यातील पांगरी येथे शाळापूर्व तयारी पहिला मेळावा संपन्न....!


💥ढोल ताशांच्या गजरात बालकांची फेटे बांधून मिरवणूक💥

जिंतूर प्रतिनिधी / बी. डी. रामपूरकर

जिंतूर तालुक्यातील पांगरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक के. सी.घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली आज बुधवारी शाळा पूर्वतयारी  मेळावा उत्साहात संपन्न झाला.शाळेतील शिक्षकांच्या कल्पनेतून  स्टाॅल सजावट करण्यात आली होती.या मेळाव्याचे उदघाटन सरपंच  मीनाताई बुधवंत यांच्या हस्ते करण्यात आले.

या मेळाव्या अंतर्गत प्रभात फेरी,जनजागृती,विद्यार्थ्यांचे स्वागत,माझा पहिला ठसा,सेल्फी पॉइंट,बालकांची नोंदणी,शारीरिक विकास, बौद्धिक विकास,सामाजिक आणि भावनात्मक   विकास, भाषा विकास,गणनपूर्व तयारी पालकांना मार्गदर्शन आदी अनेक उपक्रम राबविण्यात आले. 

यासाठी माजी सरपंच निलेश  दडस, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गुलाबराव बुधवंत,सर्व सदस्य, माता पालक संघ, शिक्षक पालक संघ ,अंगणवाडी ताई, स्वयंसेवक, पालक आणि सर्व शिक्षक वृंद यांचे सहकार्य लाभले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या