💥सेनगाव तालुक्यातील येलदरी धरणग्रस्त गावांना उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या भेटी...!


💥यावेळी पूर्णा धरणग्रस्त समितीचे अध्यक्ष एकनाथराव हराळ सरपंच खडकी येथील ग्रामपंचायत मधे चर्चा करण्यात आली💥


शिवशंकर निरगुडे ; हिंगोली प्रतिनिधी 

सेनगाव : तालुक्यातील येलदरी धरणग्रस्ताचा मुद्दा चांगला तापला आहें पूर्णा धरणग्रस्त समितीच्या वतीने दि 28/03/2023 रोजी खैरी घुमट गट येथे आमरण उपोषण सुरुवात केली होती प्रशासनाकडून लेखी आश्वासन दिल्या नंतर हें आंदोलन मागें घेण्यात आले होते प्रशासनाच्या वतीने दहा दिवसाच्या आता अहवाल सादर करा असे आव्हान उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या.

आज गुरूवार दि.21 एप्रिल 2022 रोजी येलदरी धरणग्रस्त गावांना भेटी दिल्या आहेत खडकी .धोतरा .बोरखेडी  खैरी घुमट या सह आदी गावात उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी तहसीलदार जिवनकुमार कांबळे .सेनगाव वनपरीक्षत्र ढगे साहेब गोरेगाव अप्पर तहसीलदार सेनगाव पंचायत समिती विस्तार अधिकारी जारे साहेब यांनी आज धरणग्रस्त गावांना भेटी देऊन तेथील ग्रामस्था सोबत चर्चा केली पूर्णा धरणग्रस्त समिती चे अध्यक्ष एकनाथराव हराळ सरपंच खडकी येथील ग्रामपंचायत मधे चर्चा करण्यात ली या धरणग्रस्तांना केवळ 100 मोबदला देऊन प्रशासनान या ग्रामस्थां वाऱ्यावर सोडले आहें येलदरी धरणग्रस्तांच्या जमिनीह्या भारतीय कायद्याच्या अनूसार संपादित केल्या गेल्या नाहीत 1994ते 1935 इंग्रज कायद्याच्या अनुसार ह्या जमिनी संपादित केल्या गेल्या आहेत या धरणग्रस्ताना 2014 भारतीय कायद्याच्या नुसार मोबदला देण्यात यावा आणि या धरणग्रस्त गावांना मूलभूत सोई सुविधा ऊपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी येथील ग्रामस्थ करित आहेत खरच सरकार आत्ता या धरणग्रस्त गावांना घरे बांधून देणार का आणि धरणात गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळणार का असे अनेक प्रश्न आत्ता या सरकारकडे उपस्थितीत केले गेले आहेत जोपर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत पूर्णा धरणग्रस्त समिती लढा चालूच ठेवेल अशी पूर्णा समितीचेअध्यक्ष एकनाथराव हराळ यांनी सांगितले आहें यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात सर्व अधिकारी यांचा ग्रामपंचायत कडून सत्कार देखिल करण्यात आला आहें....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या