💥शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज...!


💥कायद्याचे पालन करण्याचे पोलीस निरीक्षक हूड यांचे आवाहन💥

फुलचंद भगत

मंगरूळपीर :- पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील हुड यांनी तालुक्यातील नागरिकांचे सहजीवन शांततामय पद्धतीने पुढे मार्गक्रमीत करण्यासाठी सर्व नागरिकांनी कायद्याचे पालन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कोळंबी येथे भेटी दरम्यान केले. 

    आधुनिक जीवन जगत असताना भौतिक वस्तूंची रेलचेल मोठ्या प्रमाणात प्रत्येक कुटुंबामध्ये आता झालेली असून मोठ्या कष्टाने आणि बचतीतून ह्या किमती भौतिक सोयी सुविधांची निर्मिती नागरिकांनी केलेली आहे.भौतिक सोयी सुविधा मिळविण्यासाठी काही अपप्रवृत्तीचे असामाजिक तत्त्वे गैर मार्गाचा अवलंब करीत असतात जे रोखणे पोलीस प्रशासनाचे काम असून नागरिकांनी नैतिकतेने वागण्याचा सल्ला कोळंबी येथील भेटीदरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप मोहनावाले यांच्याकडून सत्कार प्रसंगी ठाणेदाराने काढलेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या