💥परभणी जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाच्या पाठपुराव्याला यश....!


💥निम्न दुधना डाव्या कालव्यावरील रखडलेली बोबडे टाकळी व पिंगळी कोथाळा कामे अंतिम टप्यात💥

परभणी - निम्न दुधना प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या व परभणी तालुक्यातून जाणाऱ्या निम्न दुधना डाव्या कालव्यावरील कामे अर्धवट असून पाच ते सहा वर्षापुर्वी कंत्राटदाराने संबंधित कामे सोडून देवून काम बंद केले होते. तेव्हा पासून कालव्याची कामे अर्धवट अवस्थेत होती शिवाय या भागातील मुख्य कालवा, उपकालवा, चाऱ्या व शेतचाऱ्या गाळाने भरल्या होत्या व काही ठिकाणी ही कामे अर्धवट सोडून देण्यात आली होती. 


या सर्व कामाचा आढावा घेवून प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र राज्यमंत्री मा.ना. बच्चुभाऊ कडू यांच्याकडे तक्रार केली व रखडलेली कामे तात्काळ मार्गी लावण्या बाबत विनंती केली होती. त्यानुसार दि. २६ ऑक्टोंबर २०२ ९ रोजी राज्यमंत्री मा. बच्चुभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली व त्यांचा दालनात औरंगाबाद व परभणीच्या जलसंपदा विभागाच्या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची तातडीची आढावा बैठक घेण्यात आली या वेळी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने उपस्थित होते. या बैठकीत जिल्ह्यातील रखडलेल्या कामांना तात्काळ सुरुवात करण्याबाबत मा.ना. बच्चूभाऊ कडू यांनी आदेशित केले. त्यानुसार निम्न दुधना प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या डाव्या कालव्यावरील मुख्य कालवा, उपकालवा, चाऱ्यांच्या देखभालीची कामे व रखडलेल्या कामांची यादी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दि. २४ डिसेंबर २०२१ रोजी माजलगाव कालवा विभाग क्र . १० चे कार्यकारी अभियंता श्री प्रसाद लांब यांना देण्यात आली. निवेदनानुसार दि. ३१ डिसेंबर २०२१ रोजी श्री . प्रसाद लांब यांनी रखडलेल्या संबंधित कामाची पाहणी केली यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी सोबत उपस्थित होते. दि .०६ जानेवारी २०२२ रोजी निम्न दुधना प्रकल्पावरील कालव्याच्या देखभालीच्या कामाला सुरुवात करण्यात आली यात मटकराळा , सावंगी खुर्द , साडेगाव , वाडीदमई येथील कालवा साफसफाई व देखभालीच्या कामांना सुरुवात करण्यात आली व सावंगी खुर्द ते बोबडे टाकळी व पुढे पिगळी कोथाळा येथे जाणाऱ्या पाच वर्षापासून रखडलेल्या उपकालव्याच्या कामांना सुरुवात करण्यात आली होती.

 आज दि. १६ एप्रिल २०२२ रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सावंगी खुर्द ते बोबडे टाकळी व पुढे पिंगळी कोथाळा पर्यंत जाणाऱ्या निम्न दुधना डाव्या कालव्यावरील उपकालव्याच्या कामाची पाहणी केली असून ते काम अंतीम टप्यात आहे व पुढील एका महिन्यामध्ये काम पूर्ण होईल. मागील पाच ते सहा वर्षापासून रखडल्या कामांना सुरुवात झाली असून संबंधित काम पूर्ण झाल्यावर परिसरातील हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना होणार आहे.

 माजलगाव कालवा क्र १० चे कार्यकारी अभियंता श्री प्रसाद लांब, सहाय्यक अभियंता श्रीमती काळे मॅडम, कनिष्ठ अभियंता श्री प्रसाद गायकवाड यांनी तत्परतेने संबंधित कामांना गती दिली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाच्या पाठपुराव्यामुळे मागील पाच ते सहा वर्षापासून रखडलेल्या सावंगी खुर्द, बोबडे टाकळी व पिंगळी कोथळा भागातील उपकालव्याच्या कामांना गती आली असून परिसरातील शेतकऱ्यांनी मा.ना. बच्चूभाऊ कडू व प्रहार जनशक्ती पक्षाचे आभार मानले आहेत. आज पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, मटकहाळा शाखा प्रमुख उध्दव गरुड, मिडिया प्रभारी नकुल होंगे, शहर चिटणीस वैभव संघई, माऊली गरुड, दत्तराव रवंदळे इत्यादींनी कामाची पाहणी केली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या