💥पुर्णेतील शास्त्री नगर परिसरातील अष्टभुजा देवी मंदिरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती साजरी...!


💥यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष प्रक्षित सवनेकर यांची प्रमुख उपस्थिती💥


पुर्णा (दि.१५ एप्रिल) - शहरातील अष्टभुजा देवी मंदिर येथे काल गुरूवार दि.१४ एप्रिल रोजी महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष प्रक्षित सवनेकर यांची उपस्थिती होती सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजू गायकवाड,राहुल वाघमारे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजक अखिल भारतीय तेलगू महासंघाचे दिनेश मोगले,रमेश अण्णा बरकुंटे,नरेश चंपाळकर,गुत्तेदार बरकुंटे आदींनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या