💥सेनगाव तालुक्यातील सुलदली बुद्रुक येथे बियाण्याचा कांदा जळून शेतकऱ्याचे ४ लाख रुपयांचे नुकसान....!


💥या घटनेत शेतकऱ्याचे तब्बल साडे चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज💥

शिवशंकर निरगुडे : हिंगोली प्रतिनिधी

सेनगाव तालुक्यातील सुलदरी बुद्रुक येथील शेतकऱ्यांच्या शेतातील कांद्याच्या बियाणाला दि 20/04/2022 रोजी आग लागून अंदाजे 9 किण्टल कांद्याचे बियाणे जळून खाक झाले आहें.


शकुंतला विठ्ठलराव मुटकुळे असे या शेतकऱ्यांचे नाव आहें गट क्रं 339 मधे कांद्याच्या बियांणाचा ढीग होता आणि तो पूर्ण पणे जळून खाक झाला आहें त्यामुळे आत्ता हा शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहें अंदाजे 9 किण्टल कांद्याचे आजच्या बाजारभावा नुसार प्रति किण्टल 45000 हजार प्रमाने 9 किण्टल चे 40.5000 साडे चार लाख रुपयाचे नुकसान झाले आहें तरी प्रशासनाच्या वतीने या शेतकऱ्याला आर्थिक नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी  राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी चे महाराष्ट्र प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले यांनी केली आहें

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या