💥सेनगाव ते रिसोड राष्ट्रीय महामार्गावर खेरखैडा येथील ग्रामस्थाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन....!


💥खैरखेडा येथील लिंकलाईन कामात दिरंगाई होत असल्याने आंदोलन रस्त्यावर वाहणाच्या लांबच लांब रांगा💥


💥महावितरण अधीकारी यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे💥

 शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

सेनगाव  तालुक्यातील खैरखेडा येथील ग्रामस्थानी सेनगाव ते रिसोड महामार्गावर मंगळवार रोजी सकाळी ११ वाजता महावितरण लिंकलाईन कामात दिरंगाई होत असल्याने रास्ता रोको आंदोलन केले आंदोलन दरम्यान काही काळ रस्त्यावर लांबच लांब वाहणाच्या रांगा लागल्या होत्या. 


तालुक्यातील पानकनेरगांव येथील 33 केव्ही अंतर्गत खैरखेडा येथील लिंक लाईन कामाची मंजुरी बऱ्याच दिवसापासून झालेली आहे परंतु संबंधित कंत्राटदार व महावितरण अधिकारी यांच्यामार्फत दिरंगाई व तात्काळ काम होत नसल्याने यामूळे गावकर्यात तिव्र संताप व्यक्त केला जात होता सदरील तात्काळ काम न झाल्यास  आंदोलन करण्यात येईल असे या संदर्भात  प्रशासणाला निवेदन दिले होते परंतु कूठलीच दखल न घेतल्या मुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने 26  एप्रील रोजी सकाळी ११ वाजता काही तास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आक्रोश  आंदोलन करण्यात आले होते.

रास्ता रोको दरम्यान  रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आंदोलन माहिती मिळताच सेनगाव ठाण्याचे पोलीस निरिक्षक रणजित भोईटे यांनी आंदोलन स्थळी धाव घेतली महावितरण अधिकारी लोखंडे,घुगे.डोईफोडे यांच्या लेखी स्वरूपांच्या आश्वासनानंतर अखेर  आंदोलन मागें घेण्यात आले या वेळी अमोल मोरे, सचिन मोरे, शखनपटे, सुभाष मोरे, किसन मोरे, देवराव मोरे, प्रकाश मोरे, दत्तराव खरात, भीमराव मोरे, रामदास मोरे, मोतीराम मोरे, भागवत मोरे, रामेश्वर मोरे, संतोष मोरे, सुनील नवघरे, पिंटू खिल्लारी, शालिग्राम मोरे, विश्वंभर वाठोरे, देवीदास मोरे, ज्ञानेश्वर ढोरे, पिंटू ढोरे, संतोष खनपटे, हनुमान खनपटे, दीपक मोरे, मधुकर खिल्लारे, दस मोरे,लक्ष्मण मोरे, व शेकडो आंदोलन कर्ते उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या